Ujani Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रब्बीसाठी १५ जानेवारीपासून पहिले आवर्तन सुटणार

Ujani Dam : उजनी धरणातून १५ जानेवारीपासून रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढे ४० दिवस पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणातून १५ जानेवारीपासून रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढे ४० दिवस पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. पण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी हा निर्णय रखडला आहे. या महिनाअखेरपर्यंत याबाबतचा निर्णय अंतिम होणार आहे, असे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र आहे ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा या प्रमुख पिकांशिवाय अन्य फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८३ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

आता पावसाळा संपून दोन महिने झाले आहेत. पण सध्या रब्बीच्या पेरण्या होऊन या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष उजनीच्या आवर्तनाकडे लागले आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक भागातील अधिकाऱ्यांकडे तशी मागणीही केली आहे.

प्रशासनानेही त्यानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. पण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी हा निर्णय होऊ शकलेला नाही.

पण या महिनाअखेर ही बैठक होईल आणि साधारण १५ जानेवारी अखेर हे आवर्तन सोडले जाईल आणि ते पुढे संपूर्ण जानेवारीतील १५ दिवस आणि फेब्रुवारीचा संपूर्ण महिना असे ४० दिवसापर्यंत सुरू राहणार आहे, असेही सांगण्यात आले. सध्या उजनी धरणात १२० टीमसी एवढा एकूण साठा आहे, तर त्यापैकी ५६.३९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. तर या पाण्याची टक्केवारी १०५.२० टक्के इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT