Olive Ridley Turtle Agrowon
ॲग्रो विशेष

Olive Ridley Turtle : गुहागर किनारी हंगामातील कासवाचे पहिले घरटे

Olive Ridley Turtles Nest : रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचारी यांनी या घरट्यातील ११७ अंडी संरक्षित केली आहेत.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचारी यांनी या घरट्यातील ११७ अंडी संरक्षित केली आहेत. नव्या हंगामातील राज्यातील पहिले घरटे मिळणारा गुहागर हा या वर्षीचा पहिला समुद्र किनारा आहे.

गुहागर बाग परिसरातील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी (ता. १५) कासव मित्र फिरत होते. त्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंडी घालून गेलेल्या कासवाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. या खुणांचा मागोवा घेतल्यावर कासव मित्रांना घरटे सापडले.

तातडीने कासव मित्र तोडणकर यांनी वनपाल अमित निमकर यांना बोलावले. वनपाल निमकर आणि वनरक्षक गायकवाड यांच्या उपस्थितीत कासवाचे घरटे उपसून मार्गदर्शक सूचनांनुसार त्यातील अंडी बाहेर काढण्यात आली.

ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासव साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. गेली दोन वर्षे सातत्याने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर सर्वाधिक कासवे अंडी घालण्यासाठी आली. मात्र गेली दोन वर्षे कासवाची अंडी मिळण्याचा कालावधी जानेवारीपर्यंत लांबला होता.

आज घरटे सापडल्यानंतर तात्पुरती शेड करून त्यात संरक्षित करण्यात आले आहे. गुहागरमधील घरटी मिळण्याचे प्रमाण पाहता, मोठी शेड उभारावी लागते. ही शेड उभारण्याचे काम सुरू आहे.
अमित निमकर, वनपाल, गुहागर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT