Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : चंद्रपुरातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

Unseasonal Rain Crop Damage : संततधार पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसल्याने खरीपातील पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे देखील हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

Team Agrowon

Chandrapur News : संततधार पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसल्याने खरीपातील पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे देखील हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परिणामी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे, की चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून धानाला उत्पादकता खर्चावर आधारित दर मिळत नाही, अशी स्थिती आहे.

यंदा उत्पदकता खर्चाच्या तुलनेत मिळालेला हमीभाव हा १५०० रुपयांनी कमी आहे. त्यातच यंदा झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या या पिकाचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यंदाच्या हंगामात किमान चार ते पाच वेळा मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. पीक हातात येत असताना तो कोसळल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर विमा भरपाई सरसकट देण्यात यावी, अशी मागणीदेखील मारकवार यांनी केली आहे.

८ जूनला जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाने अनेकांची घरे, टपऱ्या व शेतकऱ्यांच्या शेतातील शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला नाही. परिणामी अनेकांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनादेखील नुकसान भरपाई मिळण्याची तजवीज व्हावी, अशी मागणी मारकवार यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT