Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Crop Damage : आठ एकरांतील हरभरा पिकावर शेतकऱ्याने फिरवला नांगर

Unseasonal Rain Crop Damage : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोग वाढले. हरभरा पिकात मर रोग वाढल्यामुळे पीक खराब होत आहे.

पिकाची शाश्वती दिसत नसल्याने वनोजा गावात शेतकऱ्याने आठ एकरांतील हरभऱ्याचे पीक मोडून काढले. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी नरेंद्र राऊत यांच्या गट नं २५५/१ असलेल्या शेतीमधील हरभऱ्याचे पीक २७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसामुळे खराब झाले आहे.

यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादन येण्याची शक्यता नसल्याचे पाहून राऊत यांनी आपल्या ८ एकर शेतातील पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पेरणीसाठी बियाणे, खत, पेरणी, मशागतीवर मोठा खर्च करत मोठ्या आशेने रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी केली होती. मात्र पाऊस व किडींनी सर्व हिरावून नेले. शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

रब्बीत ८ एकरांत हरभरा पिकाची पेरणी केली. मात्र २७ आणि २८ नोव्हेंबरला झालेल्या पावसामुळे शेतातील पीक पूर्ण खराब झाले आहे. पिकाला काही येणार नसल्याचे पाहून त्यावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवावा लागला. नुकसानभरपाई मिळाली तर दुबार पेरणी करून दुसरे पीक घेता येईल.
नरेंद्र राऊत, शेतकरी, वनोजा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT