Rahul Gandhi Meet Farmer Family Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अनपेक्षित भेटीने भारावले उचगावातील शेतकरी कुटुंबीय

Rahul Gandhi in Kolhapur : देशपातळीवरचा नेता स्वतः भाज्यासाठी आपल्याला मदत करतोय, अशी कल्पनाही नसणारी घटना सनदे कुटुंबीयांच्या घरात घडत होती.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ते आले... आणि थेट स्वयंपाक घरातच गेले. जेवणाची तयारी सुरू होती. अनपेक्षितपणे त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. भाकरी करण्याचे काम सुरू होते. हरभऱ्याची, वांग्याची, कांदा पातीची भाजी करत असतानाच त्यांनीही भाजी करण्‍यासाठी हातभार लावला.

या अनपेक्षित घटनेने उचगाव (ता.करवीर) येथील अजित व अंजना सनदे या दांपत्यासह त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. दलित वस्तीतील कौलारू घरात राहात कुटुंबीयांच्या घरात शनिवारचा दिवस उत्सवापेक्षा कमी नव्हता.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. ५) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कोल्हापूरला भेट दिली. विमानतळावरून कार्यक्रमस्थळी येतानाच त्यांची गाडी उचगाव दलित वस्तीत वळाली. त्यांच्या भेटीची कुणालाच कल्पना नव्‍हती. शेतकरी कुटुंबातील असलेले व सध्या टेम्पोचालक असणारे अजित सनदे यांच्या घरासमोर गाड्यांचा ताफा येऊन थांबला.

कोणत्‍याही डामडौलाशिवाय राहुल गांधी यांची साधेपणाने घरात एंट्री झाली. त्यांना पाहून सनदे कुटुंबीय भारावून गेले. त्यांना चहा देण्यात आला. चहाची चव त्यांना खूप आवडली, त्यामुळे ते म्हणाले, की मी आज येथेच जेवण करणार. आणि जेवण करण्यासाठी तुम्‍हाला मदतही करणार, असे म्हणत त्यांनी स्वयंपाकघर गाठले. हे ऐकून घरातील महिला सदस्यांचे हातच थबकले. त्यानंतर भाजी करण्यासाठी ते महिला सदस्यांना मदत करीत होते.

देशपातळीवरचा नेता स्वतः भाज्यासाठी आपल्याला मदत करतोय, अशी कल्पनाही नसणारी घटना सनदे कुटुंबीयांच्या घरात घडत होती. तब्बल तासभर स्वयंपाकघरात राहुल गांधी यांनी मदत केली आणि त्यानंतर तेथेच जेवण करून त्यांनी सनदे कुटुंबीयांचा निरोप घेतला. स्वयंपाकात मदत करतानाच त्यांनी त्यांची परिस्थितीही जाणून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT