Nagar News : श्रीगोंदा तालुक्यातील दूधभेसळ (Adulterated Milk) प्रकरणाची व्याप्ती वरचेवर वाढत आहे. आतापर्यंत या प्रकरणात सुमारे चोवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दूध भेसळ प्रकरण उघडे झाल्यानंतर तालुक्यात जवळपास एक लाख लिटर दुधाची घट झाली आहे.
त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात दूध भेसळ केली जात होती हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, चौकशीत श्रीगोंद्यासह अन्य तालुक्यातील दूध भेसळही उघडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून उघड झालेल्या दूधभेसळीच्या गंभीर प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत आहे. आतापर्यंत चोवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काष्टीतून उघड झालेल्या दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढत असून भेसळ बंद झाल्याने सुमारे एक लाख लिटरच्या जवळपास दूध संकलन कमी झाले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत.
दूध भेसळीला पाठबळ देणारे कोण राजकीय नेते आहेत का याची चौकशी करून अशा लोकांची नावे उघड करावीत अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे. दूधभेसळ प्रकरण थेट विधानपरिषदेत गाजले आणि त्यावरून श्रीगोंदेकरांनी मोर्चाही काढला. भेसळ प्रकरणातील सगळ्या घडामोडींत
स्थानिक किरकोळ आरोपींना पोलिस पकडत असले, तरी बडे मासे का हाती लागत नाहीत, याबद्दल संशय आहे. आरोपींत बडे नावे समोर येत असल्याने भेसळीत हात गुंतलेलेही धस्तावले आहेत.
दरम्यान नगरच्या शेजारच्या आष्टी तालुक्यातही दूध भेसळ पकडली असल्याने नगर, बीड जिल्ह्यात दूध भेसळ अधिक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दूध भेसळ खोरांवर किती कठोर कारवाई होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
विखे पाटील आक्रमक
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, बीड जिल्ह्यातील आष्टीसह अन्य भागात आढळून आलेल्या दूध भेसळीप्रकरणावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.
शिर्डीतील प्रदर्शन कार्यक्रमात भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करणार असल्याचे सांगून श्रीगोंद्यातील दूध भेसळखोरावर कारवाई करणार असल्याचे सूचित केले आहे. शेतकऱ्यांनी दूध भेसळ न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.