Great Indian Bustard  Agrowon
ॲग्रो विशेष

Great Indian Bustard : कृत्रिम गर्भधारणेतून ‘माळढोक’प्रजननाचा प्रयोग यशस्वी

Artificial Insemination : राजस्थान वन विभागाच्या जैसलमेरमधील डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका प्रयोगात कृत्रिम गर्भाधारणेद्वारे माळढोकचे जगातील पहिले पिलू जन्मले आहे.

Team Agrowon

Solapur News : भारतात १५० पेक्षा कमी दुर्मिळ माळढोक पक्षी आहेत, ज्यापैकी ज्यादा संख्या राजस्थानात आहे. राजस्थान वन विभागाच्या जैसलमेरमधील डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका प्रयोगात कृत्रिम गर्भाधारणेद्वारे माळढोकचे जगातील पहिले पिलू जन्मले आहे.

केंद्र शासन व भारतीय वन्यजीव संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजस्थानात माळढोक पक्ष्यांचे कृत्रिम प्रजनन केंद्र सुरू केले आहे. तेथेच नव्या तंत्राचा वापर करून कृत्रिम गर्भधारणेतून माळढोकचे पिलू जन्माला आले.

लहान आणि गडद ठिपक्यांसह तपकिरी रंगाचे हे पिल्लू असून, सध्या ते एक महिने वयाचे आहे. कृत्रिम गर्भाधारणेद्वारे जन्मलेले हे जगातील पहिले पिलू आहे. माळढोक पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

कृत्रिम प्रजनन केंद्राचे काम

मुख्यतः केंद्र सरकार, राजस्थान सरकार आणि वन विभागाच्या सहकार्याने बस्टर्ड पुनर्प्राप्ती कार्यक्रमांतर्गत जैसलमेरमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड कृत्रिम प्रजनन केंद्राची स्थापना करण्यात आली. ग्रेट इंडियन बस्टर्डची लोकसंख्या वाढवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

यातील डब्ल्यू. आय. आय.च्या शास्त्रज्ञांना अबुधाबी येथील इंटरनॅशनल फंड फॉर हौबारा कन्झर्वेशन येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर या शास्त्रज्ञांनी जैसलमेरमध्ये कृत्रिम गर्भाधारणेद्वारे माळढोकच्या प्रजननाचा हा कार्यक्रम राबवला आणि त्यात यशही मिळाले, असे मुख्य वन्यजीव वॉर्डन पी. के. उपाध्याय यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : शेतीत महिलांचे नेतृत्व वाढले तरच कृषी विकासाला नवी दिशा मिळेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

US Israel Iran War: मोठा दिलासा, भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी

Power Supply Disconnection: अकोला विभागातील २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Women Empowerment: महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Grape Farming: दर्जेदार बेदाण्यासह संभाव्य घड निर्मितीसाठी उपाययोजना

SCROLL FOR NEXT