Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : अपेक्षित ऊस गाळप हंगाम चालण्याची शक्यता कमीच!

Sugarcane Factory : पाच जिल्ह्यांतील बहुतांश कारखान्यांचा हंगाम यंदा फेब्रुवारी अखेरच गुंडाळण्याची शक्यता जास्त आहे. फार तर १५ मार्चपर्यंत बीडमधील पाच व जालन्यातील दोन कारखाने चालतील अशी आशा व शक्यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह खानदेशातील नंदुरबार, जळगाव मिळून पाच जिल्ह्यांतील बहुतांश कारखान्यांचा हंगाम यंदा फेब्रुवारी अखेरच गुंडाळण्याची शक्यता जास्त आहे. फार तर १५ मार्चपर्यंत बीडमधील पाच व जालन्यातील दोन कारखाने चालतील अशी आशा व शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये १३ सहकारी, तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन ऊस गाळपाची सरासरी क्षमता ४३९०० टन असून खासगी कारखान्यांची सरासरी गाळप क्षमता ४८ हजार टन इतकी आहे.

दररोज होत असलेले गाळप पाहता एकाही जिल्ह्यातील कारखाना क्षमतेनुसार ऊस गाळप करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी अखेरच आटोपण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे यंदाही मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत असल्याने पुढील वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी ही ऊस उपलब्ध किती होईल हा प्रश्न आहे.

३६ लाख ५६ हजार टन उसाचे गाळप

छत्रपती संभाजी नगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २६ डिसेंबर अखेर ३० लाख ५६ हजार ४९८ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ७.५३ टक्के साखर उताऱ्याने २७ लाख ५४ हजार ९८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गतवर्षी डिसेंबर अखेरच्या गाळपाचा अंदाज घेता यंदाचे ऊस गाळप थोडे कमीच आहे.

२६ डिसेंबरपर्यंत गाळप हंगाम

जिल्हा कारखाने उस गाळप साखर उत्पादन उतारा (उस टनामध्ये) (साखर क्‍विंटलमध्ये)(उतारा टक्‍केवारीत)

नंदूरबार २ ३८१५३४ २८५८३१ ७.४९

जळगाव २ ११८७१५ ९३३२५ ७.८६

छ.संभाजीनगर ६ ७१४७९४ ५८२५४० ८.१५

जालना ५ ९०४५०४ ७४४२१५ ८.२३

बीड ७ १५३६९५१ १०४८१८७ ६.८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cold Weather: धुळे, जेऊरमध्ये थंडीची लाट

Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला

Traders Issue: खानदेशात तेंदू पत्ता व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा

Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी

SCROLL FOR NEXT