Sugarcane Crushing : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत २६ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : यंदाच्या ऊस गाळप हंगामात पाच जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह खानदेशातील नंदुरबार, जळगाव मिळून पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २६ लाख २३ हजार ८६० टन उसाचे गाळप करत १८ लाख ९१ हजार ४६९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. (ता. १४) डिसेंबपर्यंत झालेल्या गाळपात सहभागी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.२१ टक्के इतका राहिला.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात पाच जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन ऊस गाळपाची सरासरी क्षमता ४३ हजार ९०० टन असून, खासगी कारखान्यांची सरासरी गाळपक्षमता ४८ हजार टन इतकी आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात २३ लाख टन उसाचे गाळप

त्या तुलनेत सर्व कारखान्यांनी १४ डिसेंबरला सरासरी ६८ हजार ३७० टन उसाचे गाळप केले. या गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील २ कारखान्यांच्या ८ हजार ८६० टन ऊसगाळपासह जळगावमधील दोन कारखान्यांच्या २४५० टन, छत्रपती संभाजीनगरमधील सहा कारखान्यांच्या १४ हजार ९५३ टन, जालनातील सहा कारखान्यांच्या १४ हजार ६४५ टन, तर बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांच्या गाळप केलेल्या २७ हजार ४६२ उसाचा समावेश आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : ऊस लागवड घसरल्याने गाळपाचे दिवसही घटणार

या गाळपातून ५८ हजार ५८२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कारखान्यांची ऊस गाळपक्षमता वाढली असली, तरी प्रत्यक्षात १४ डिसेंबर रोजीचे गाळप पाहता एकाही जिल्ह्यातील कारखाना क्षमतेनुसार ऊस गाळप करत असल्याचे दिसत नाही.

१४ डिसेंबरपर्यंतचा गाळप हंगाम (उस टनांमध्ये) (साखर क्‍विंटलमध्ये)(उतारा टक्‍केवारीत)

जिल्हा कारखाने उस गाळप साखर उत्पादन उतारा

नंदूरबार २ २५७१३९ १८७४१५ ७.२९

जळगाव २ ९२७२० ६६५२५ ७.१७

छ.संभाजीनगर ६ ५३४६५१ ४२०६२५ ७.८७

जालना ५ ६५९६२२ ५१८७९६ ७.८७

बीड ७ १०७९७२८ ६९७८०९ ६.४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com