Sugarcane Season : अकरा साखर कारखान्यांना मिळेना गाळप परवाना

Sugarcane Crushing : ऊस गाळप हंगाम अर्ध्यावर आलेला असताना अजूनही राज्यातील ११ साखर कारखाने गाळप परवाना मिळवू शकलेले नाहीत.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऊस गाळप हंगाम अर्ध्यावर आलेला असताना अजूनही राज्यातील ११ साखर कारखाने गाळप परवाना मिळवू शकलेले नाहीत. यात सात सहकारी व चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

राज्यात यंदा १०२ खासगी व १०१ सहकारी साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळालेला आहे. मात्र ११ कारखान्यांनी शासकीय अटींची पूर्तता अद्यापही केलेली नाही. यातील काही कारखान्यांनी थकित ‘एफआरपी’ दिलेली नाही.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : नांदेड विभागात ऊस गाळपाला गती

तर काही कारखाने मुख्यमंत्री निधी, साखर संकुल निधी, ऊसतोड महामंडळाची वर्गणी दिलेली नाही. विशेष म्हणजे यातील काही कारखान्यांच्या क्षेत्रात पुरेसा ऊस नाही. तसेच ऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस पुरवत समस्येतून मार्ग काढला आहे.

साखर आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गाळप परवान्यासाठी काही कारखान्यांनी अपूर्ण माहिती देत ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. मात्र परवाना देण्यापूर्वी आयुक्तालयाकडून १४ मुद्द्यांची काटेकोर तपासणी केली जाते.

अटीशर्तींची पूर्तता होत नसल्यास कारखान्यांना कळवले जाते. परंतु कळवूनदेखील माहिती न पाठविल्यास परवाना दिला जात नाही. जयभवानी कारखान्याने उशिरा माहिती सादर केली आहे. त्यामुळे या कारखान्याला परवाना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Maharashtra : ऊस गाळपात महाराष्ट्र आघाडीवर, देशातील साखर उत्पादन घटलं

दरम्यान, परवाना घेतलेल्या २०३ कारखान्यांपैकी १९१ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. यात ९३ सहकारी व ९८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून या कारखान्यांनी १८ डिसेंबरअखेर ३१६.४८ लाख टन ऊस खरेदी केला व गाळपातून २७०.३४ लाख क्विंटल साखर तयार केलेली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा सध्या ८.५४ टक्के मिळतो आहे.

गाळप परवाना मिळवू न शकलेले कारखाने

घृष्णेश्‍वर शुगर, अंबाजोगाई (कंसातील छत्रपती संभाजीनगर), अनुराज शुगर्स, घोडगंगा, राजगड (पुणे), टोकाई (नांदेड), विठ्ठलसाई, तुळजाभवानी, अक्कलकोट (सोलापूर), तासगाव (कोल्हापूर), निफाड (अहमदनगर).

(कंसातील जिल्हे प्रादेशिक साखर सहसंचालकांचे मुख्यालय दर्शवितात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com