Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : सामान्य जनताच सरकारला सत्तेतून खाली खेचेल : पवार

Team Agrowon

Ratnagiri News : विशिष्ट समाजाला टार्गेट करून बोलणाऱ्यांना आवर घालण्याचे काम सत्ताधारी करीत नाहीत. याचा अर्थ सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. अशावेळी सामान्य जनता एकत्र येऊन त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळूण येथील सभेत भाजपवर केली.

येथील सावरकर मैदानात झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याने मुख्यमंत्री दिला त्यांची पुढची पिढी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे, ते पाहून एका मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी अशा पद्धतीने तयार झाल्याचे महाराष्ट्रामध्ये उदाहरण नाही. त्यांना कोणीही आवर घालत नाही याचा अर्थ त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे.

सत्तेची मस्ती जेव्हा डोक्यात जाते तेव्हा महाराष्ट्राची जनता त्यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे मात्र सध्या तो होताना दिसत नाही. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ८० वर्षांपूर्वी बांधलेले पुतळे वाऱ्याचा सामना करत आजही उभे आहेत ते वाऱ्याने पडले नाहीत.

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडत असेल तर भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर गेला आहे याचा अंदाज बांधता येईल. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या लोकांचे हित जपले पाहिजे हेच रयतेचे राज्य आहे ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. महाराष्ट्रात सर्व भाषा आणि जाती-धर्मांच्या लोकांचे हित जपण्याचे शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम व्हायला हवे.’’

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय

‘‘मी सर्वत्र फिरतोय....सगळे रस्ते बघतोय...पण मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण-कराड मार्ग बघितल्यानंतर मान शरमेने खाली जाते. ज्या पद्धतीने सरकार कोकणातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे ते घृणास्पद आहे. आमचे सरकार आल्यानंतर दोन महिन्यांत उच्चपदस्थ समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, ’’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल. चिपळूणबाबत देखील अद्याप निर्णय झालेला नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

Organic Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

Sugarcane Season Maharashtra : ऊस गाळप हंगामाची तारीख ठरली, पण ऊस उत्पादकांच्या समस्यांचं काय ?

Animal Disease : जनावरांमधील जिवाणूजन्य आजार : लिस्टेरिओसिस

Dairy Business : आईच्या शिकवणीमुळेच दुग्धव्यवसायात प्रगती

SCROLL FOR NEXT