Sharad Pawar : आधुनिक शिक्षणाचे व्हिजन ठेवून रयत वाटचाल करेल

Karmveer Jayanti : शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. आधुनिकता, तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Satara News : शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. आधुनिकता, तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी (कर्मवीर भाऊराव पाटील) काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देऊ. रयत शिक्षण संस्था आधुनिक शिक्षणाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करेल, असा मला विश्वास आहे, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त श्री. पवार यांनी कर्मवीर यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगिरथ शिंदे, अरुण कडू, कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव बी. बी. पवार, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रामशेठ ठाकूर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार सुमन पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : शक्तिपीठ महामार्गाबाबत शरद पवारांचे वक्तव्य, महामार्ग विरोधी परिषदेस हजर राहण्याचा दिला शब्द

श्री. पवार म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. शिक्षणापासून दूर असणाऱ्या उपेक्षित समाजाला प्रगती करता येईल या विचाराने महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज यांनी प्रयत्न केले. ही विचारधारा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःला शिक्षणासाठी झोकून घेतले.

Sharad Pawar
Sharad Pawar : केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावरून शरद पवार यांचा हल्लाबोल

अण्णांचे कार्य समाजाच्या प्रगतीला पूरक ठरले आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था उभारून संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जेजे आवश्यक तेते करत गेले. अण्णांच्या कार्यासाठी समाजाकडून मदतीचा ओघ सुरू झाला. संस्थेचे शिक्षणाचे हे कार्य तेवढ्याच जोमाने सुरू राहील, असा मला विश्वास आहे.

या कार्यक्रमात संस्थेतील आदर्श शिक्षक, शाखा, मानांकन मिळविलेली महाविद्यालयांतील प्राचार्यांचा श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या शाळांचे आधुनिकीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com