Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Irrigation: खडकवासला कालव्यातून इंदापूरला सोडलेले आवर्तन बंद

Water Rotation Stopped: उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन इंदापूर तालुक्यात पोहचते ना पोहोचते तोवरच अचानक बंद करण्यात आले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन इंदापूर तालुक्यात पोहचते ना पोहोचते तोवरच अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो एकर शेती अडचणीत आली आहे. येथील लाभधारक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

प्रामुख्याने हवेली, बारामती, दौंड या तालुक्यांत मुबलक पाणी दिले जाते; पण इंदापूरला मात्र दरवेळी वाऱ्यावर सोडले जाते, असे का? आम्ही पण माणसं आहोत आम्ही पण कष्टाने शेती करत आहोत; मग इंदापूरच्याच वाट्याला हा अन्याय का? असा संतप्त सवाल येथील लाभधारकांमधून उपस्थित केला जात आहे. संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी दौंड, हवेली, बारामती तालुक्यांत कारवाई करत नाहीत.

खऱ्या अर्थाने पाठीमागच्या तिन्ही तालुक्यांत कार्यवाही होणे गरजेचे आहे. पाठीमागचे पाणी बंद केलं तर पुढे टेलला पुरेशा प्रमाणात पाणी येईल. पण असे न होता इंदापूर हद्दीत पाणी आले की शेतकऱ्यांवर कार्यवाही होते. कुठल्याही वितरिकेला पाणी सोडले जात नाही हा मोठा अन्याय आहे.

त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पाण्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. दरवेळी आवर्तनापासून वंचित ठेवण्यामागे जर कोणी राजकीय भूमिका घेत असेल, तर ती अत्यंत घातक असून, त्याला शेतकऱ्यांनी आता जाब विचारण्याची वेळ आली आहे.

इंदापूरसाठी दुजाभाव का?

दौड, हवेली, बारामती या तिन्ही तालुक्यांमध्ये जिथे तीन अश्वशक्तीचा पाणी उपसा करण्याचा परवाना ज्या लाभधारकांना आहे. त्याठिकाणी साडेसात एचपीचा पंप, १० एचपीचा पंप, पाच एचपीचा पंप वापरून पाणी उपसा केला जातोय, त्या ठिकाणी संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करीत नाहीत. या पाठीमागे त्यांचा हेतू काय असतो. अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. मात्र इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियम लावत दुजाभाव का? असाही संतप्त सवाल लाभधारक शेतकरी उपस्थित करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Rummy Video : रमी खेळण्याचा विषय छोटा; बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Rural Development: सोसायट्या ठराव्यात विकास केंद्र

Bhimashankar Darshan: श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जादा बस

Junnar Tourism: जुन्नर पर्यटन आराखडा अधिवेशनात दुर्लक्षित

Expired Pesticides: जुन्या कीटकनाशकांची नव्या पॅकिंगमधून विक्री

SCROLL FOR NEXT