Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Production : शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

Shivrajsingh Chauhan : आपल्याला परंपरागत शेतीकडून आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार आहे. या वर्षी ३०० नवीन बीज वाणांचे संशोधन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Ahilynagar News : ‘‘शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे,’’ असे मत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

बाभळेश्वर (ता. राहाता) कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील व शालिनीताई विखे पाटील उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, की आपल्याला परंपरागत शेतीकडून आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार आहे. या वर्षी ३०० नवीन बीज वाणांचे संशोधन करण्यात आले आहे. खतांवरील अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रशासनाने शेतकरी हिताचे काही निर्णय घेतले. त्यानुसार शेतकऱ्यांना डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १ हजार ३५० रुपयांत दिली जाईल.

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत पंचनामा करताना आता ‘गाव’ हा घटक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात येऊन शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा पंचनामा आता सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगद्वारे केला जाणार आहे. यासाठी ८५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६९ हजार कोटी रुपये पीक नुकसान भरपाईसाठी संरक्षित ठेवण्यात आले आहेत.

या वेळी कृषिमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी कासार, मोनिका भालेराव, अश्विनी कोळपकर, कमल रोहकले, सुनीता ओहळ, सुनीता लांडे, स्वाती गागरे, कल्पना शिंदे, संगीता भागवत व मंगल खेमनर यांचा प्रातिनिधीक स्वरूपात लखपती दीदी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यशवंत शेतकरी बाबासाहेब गोरे, आशाताई दंडवते, सुभाष गडगे, गणेश अंत्रे, नवनाथ उकिर्डे व मोहन तुंवर यांचा केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण आणि एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गतच लाभार्थी शेतकरी पंकजा दळे, जयश्री निर्मळ, भागवत जाधव व अमोल कासार यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

कृषिमंत्र्यांचा साधेपणा

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोनई (ता. नेवासा) येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साधेपणा दिसून आला. सोनई येथील कुसळकर वडापावच्या हातगाडीवर थांबून वडापाव व चटकदार भज्यांचे पार्सल घेतले तर वंजारवाडी येथील रसवंतीगृहातील उसाच्या रसाची चव चाखली.

दोन्ही ठिकाणी पोलिस यंत्रणा व सर्व लवाजमा थांबल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्यांची चांगलीच धांदल व तारांबळ उडाली. कृषिमंत्र्यांचा साधेपणा लोकांना भावला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून कृषिमंत्री चौहान यांचा सन्मान केला. आमदार विठ्ठलराव लंघे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT