Export Non Basmati Rice agrowon
ॲग्रो विशेष

Rice Export : बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क

Rice Minimum Export Price : केंद्र सरकारने शनिवारी बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उढवली. त्याचबरोबर बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क निश्चित केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी शनिवारी (ता.२८) उठवली. याचबरोबर निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क निश्चित करण्याचा निर्णय देखील शनिवारी घेतला. याआधी शनिवारी केंद्राने अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्कावर निर्णय घेतला होता. तर निर्यात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले होते.

केंद्र सरकारने २० जुलै २०२३ मध्ये तांदळाच्या देशातील पुरवठा आणि किंमती नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी केली होती. पण आता बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवत निर्यात शुल्क देखील निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) याबाबत अधिसूचना काढत माहिती दिली. महासंचालनालयाने बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच बिगर-बासमती तांदळाला बंदी श्रेणीतून बाहेर काढण्यात आल्याचेही म्हटले आहे. याचबरोबर बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क निश्चित करण्यात आली आहे. याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही अधिसूचनेत महासंचालनालयाने सांगितले आहे.

अर्ध-उकडलेल्या तांदळावर निर्यात शुल्क

भारतामध्ये २०२३ मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात पिकावर परिणाम झाला होता. यामुळे देशातील तांदळाचे उत्पादन कमी झाले होते. यामुळे केंद्राने निर्यात बंदी केली होती. तसेच अर्ध-उकडलेल्या तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लादले होते. पण आता निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. तसेच निर्यात शुल्कात कपात कर ती २० टक्क्यांवरून १० टक्के केली होती. याचबरोबर ब्राऊन राईस आणि हातसडीच्या (पॉलिश न केलेला) तांदळावरील निर्यात शुल्क कमी करत ती १० टक्के करण्यात आली आहे.

बिगर-बासमती तांदळाची निर्यात

निर्यातवर बंदी असतानाही, भारताने मालदीव, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि आफ्रिकन देशांसारख्या मित्र राष्ट्रांना बिगर-बासमती तांदळाची निर्यात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT