Maharashtra Election Date 2024 Announcement CEC Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election Date 2024 : अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर; २० नोव्हेंबरला मतदान तर निकाल २३ नोव्हेंबरला!

Maharashtra Election Date 2024 Announcement CEC: महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यासह झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मंगळवारी (ता. १५) केली. राज्यात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून एकाच टप्प्यात मतदान होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून झारखंड विधानसभेची मुदत देखील ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यासह झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होईल. २३ नोव्हेंबर या कालावधीत मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता राजकीय पक्षांचे दौरे, मेळावे, सभांना अधिकच वेग येईल.

झारखंड विधानसभेचा कार्यक्रम

तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे "झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका २० नोव्हेंबरला होणार आहेत. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होईल.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना, काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. यातील २३४ जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी असून एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर १ लाख १८६ पोलिंग बुथ असतील. तर राज्यात एकूण ९.६३ कोटी मतदार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी माहिती दिली.

झारखंडचा विचार करायचा झाल्यास या राज्यात २४ जिल्हे असून ८१ जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील २८ जागा या एसटी प्रवर्ग आणि ९ जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल ५ जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात २.६ कोटी मतदार आहेत. यात १.२९ कोटी महिला तर १.३१ कोटी पुरुष मतदार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी सांगितले आहे. तसेच ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशीही माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागा वाटपासह उमेदवारांची चाचपणी देखील केली जात आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा शपथविधी देखील आज उरकण्यात आल्याने आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा रंगली होती. यानंतर आता आयोगाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला.

उमेदवारी अर्जाची मुदत

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे २० नोव्हेंबरला मतदान होईल. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यामुळे आता उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल. तर अर्जाची छाननी ३० ऑक्टोबरपर्यंत होणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवारांना मागे घेता येणार आहे.

येथेही वाजणार पोटनिवडणुकीचा बिगूल

केरळमधील १ विधानसभा मतदारसंघ आणि १ लोकसभा मतदारसंघ (वायनाड) साठी १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच उत्तराखंडमधील १ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील १ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून नांदेड मतदार संघात देखील पोटनिवडणूक लागणार आहे. २० नोव्हेंबर रोजी नांदेड मतदार संघासाठी पोटनिवडणूक होईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील २३ नोव्हेंबर रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT