Maharashtra Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Elections 2024 : साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शरद पवार राहूल गांधी मैदानात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणूकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महाविकास आगाडीने कंबर कसली आहे. यासाठी मविआने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक महत्व दिले आहे. तर आता शरद पवार साखर पट्ट्यात आपले दौरे आखत आहेत. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून महायुतीला जिंकण्याचा कानमंत्र देत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश आणि राहूल गांधी यांचा कोल्हापूर दौऱ्याने सर्वांचे लक्ष राजकीय घडामोंडीकडे वेधले आहे.

लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात सत्ता आणण्यासाठी महाविकास आगाडीने कंबर कसली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील शेतीच्या प्रश्नासह विविध नेत्याच्या नाराजीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या राज्याच्या विविध भागात नाराजांसह दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधत आहेत. तर परत एकदा साखर पट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राकडे पावले टाकत आहेत. मात्र शरद पवार यांच्यासह मविआच्या नेत्यांना येथे टक्कर देण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील साखर पट्ट्यात उतरले आहेत. गेल्या ते सतत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून कोल्हापूरमध्ये विशेषत: येत आहेत. तसेच केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडीक खासदार उदयराजे भोसले यांच्यासह भाजपचे नेते आपली तादक येथे वाढण्यावर भर देत आहेत.

असे असले तरिही सहा जिल्ह्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची पाळेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस घट्ट झाली आहेत. यामुळेच भाजपने धनंजय महाडीक उदयराजे भोसले यांच्यासह बड्या नेत्यांना फोडले. जे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी होते. याच्याबरोबर अनेक दुसरे नेते देखील सध्या भाजपात गेले आहेत. जे मुळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे आहेत. आता राजकीय वारे फिरले असून पुन्हा एकदा शरद पवार यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे. साखर पट्ट्यात अनेक बडे नेते शरद पवार यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संपर्कात आहेत. तर दिल्लीवारीकरून काही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे असल्याने अनेकांचा प्रवेश रखडलेला आहे.

आता विधानसभा काबीज करण्याचेच असे एकच लक्ष मविआच्या समोर असल्याने भाजपला कोंडीत पाडणाऱ्या नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जात आहे. यात भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला हात दिला आहे. सोलापूरातही मोहीते-पाटलांनी देखील भाजपला रामराम करत तुतारी फुंकली. त्यातच आता महाराष्ट्रातला अख्खा बीएसआर पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार आहे. यामुळे आपला गड अधिक मजबूत करण्यासाठी शरद पवार अॅक्टीव्ह झाले असून ते साखर पट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात वावरत आहेत.

दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पक्षात आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाच प्रवेश होण्याची शक्यता आहे. याबाबत हर्षवर्धन पाटील शुक्रवारी (ता.४) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण याच्याआधीच त्यांनी आणि कन्या अंकिता पाटील यांनी गुरूवारी (ता.३) सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. तर चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या अंकीता पाटील यांच्या व्हाट्सअपवरील तुतारी स्टेटसमुळेही राजकीय चर्चांना उधान आले आहे. हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाल्यास भाजपचा सहकारावरील मुख्यत्व साखर कारखान्यांवर असणारा ताबा कमी होणार आहे. या प्रवेशासोबतच सहकारातील अनेक बडे नेते देखील मविआकडे येतील. अशा प्रवेशांमुळे मात्र भाजपला खिंडार पडण्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुडाक्यात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील साखर पट्ट्यात दौरे सुरू केले आहेत. जेष्ठ नेते शदर पवार आणि राहूल गांधी भाजपला रोखण्यासह साखर पट्ट्यात मविआला मजबूत करण्यासाठी रनणीती आखत आहेत. राहूल गांधी माजी मंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. ते शुक्रवारी (ता.४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत आहेत. तर शनिवारी (ता.५) ते संविधान परिषदेला संबोधित करणार आहेत. यामुळे काँग्रेससह मविआच्या नेत्यांना कार्यक्रत्यांना नवी ऊर्जा मिळेल. राहुल गांधी महिन्याभरात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. याआधी ते सांगलीत स्वर्गीय डॉ. पंतगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते.

साखर पट्ट्यात कोण किती जागा जिंकले?

पुणे, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली अशा साखर पट्ट्यात तब्बल ७० मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ३९ जागांवर बाजी मारली होती. यात काँग्रेस-२७ आणि राष्ट्रवादीने १२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या वाट्याला २० जागा आल्या होत्या. तसेच शिवसेना ५ आणि ६ जागी अपक्ष निवडणूक आले होते. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीमुळे येथील शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना यांच्या मतदारांत विभागणी झाली होती. यामुळे पवार यांच्यासह ठाकरे यांचे प्राबल्य संपल्याची चर्चा लोकसभेच्या आधी रंगली होती. मात्र लोकसभेवेळी साखर पट्ट्यातील कोल्हापूर, सोलापूर, माढा, शिर्डी, नगर, शिरूर आणि सांगलीत मविआने मुसंडी मारत येथे आपले वजन असल्याचे दाखवून दिले होते. तर महायुतीला कोल्हापूर, पुणे आणि साताऱ्यातील एक खासदारकीची जागा राखता आली होती.

साखर पट्ट्यातील ७ जागी मविआचे खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने येथे शरद पवार यांची जादू अद्याप संपलेली नसल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील पावसाच्या सभेने राजकारण बदलेले होते. यानंतर आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेत उठवण्यासाठीच शरद पवार सतत पश्चिम मराष्ट्रात लक्ष घालत आहेत. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी आणि नव्या नेतृत्वाला सोबत घेऊन शरद पवार पुढची वाटचाल करत आहेत. याचाच भाग म्हणून सांगतीतून रोहीत पवार, बारामतीत युगेंद्र पवार, कोल्हापूर कागलमध्ये समरजित घाटगे अशांना उमेदवारी देणार आहेत. इतर ठिकाणीही त्यांनी नवे चेहरे हेरले असून काही ठिकाणी उमेदवारीवरून मतभेद आहेत. मात्र तेही संपवून शरद पवार साखर पट्ट्यात आपली ताकद वाढवत आहेत.

पण अशा वेळी याच सहकार पट्ट्यात त्यांना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित अडचणीची ठरू शकते. शेतकरी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य अधिक असल्याने याचा फायदाही थेट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पण एकंदर असे चित्र साखर पट्ट्यात असतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह मविआ विधानसभेच्या ७० मतदारसंघापैकी किती मतदार संघात मुसंडी मारते का? सहकार क्षेत्र शरद पवार यांच्या मागे उभारते का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT