Sweet Potato Agrowon
ॲग्रो विशेष

Sweet Potato Market : आषाढी एकादशीमुळे रताळ्यांची आवक घटली

Ashadhi Ekadashi : रताळे उत्पादनाचे आगार असलेल्या करमाळा, कराड परिसरात असलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे यंदा उत्पादन घटले आहे.

Team Agrowon

Pune News : रताळे उत्पादनाचे आगार असलेल्या करमाळा, कराड परिसरात असलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे यंदा उत्पादन घटले आहे. परिणामी आषाढी एकादशीनिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने दरात वाढ झाली आहे.

बुधवारी (ता. १७) एकादशी असून, त्यानिमित्ताने रविवारपासून (ता. १४) रताळ्यांच्या आवकेला सुरुवात झाली आहे. मात्र आवक घटल्याने दर सर्वसाधारणपेक्षा दुपटीने वाढले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रविवारी (ता. १४) बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील उंदरगाव, मांजरगाव येथून आवक होत आहे. येथुन सुमारे १ हजार तर कर्नाटक येथून सुमारे ३०० गोणी आवक झाली होती.

(ॲग्रो विशेष)

ही आवक सोमवारी (ता. १५) वाढण्याची शक्यता शक्यता आडतदार अमोल घुले यांनी व्यक्त केली आहे. आवक घटल्याने दर वाढले असून सरासरी दर ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो असतात, मात्र यावर्षी दर ५० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

आषाढी एकदशीनिमित्त करमाळा आणि कर्नाटक येथून आवक झाली आहे. करमाळा भागातून दाखल झालेली रताळ गावरान आणि आकाराने लहान असतात. त्याची चव गोड असल्याने मागणी आणि दर जास्त असते. तर कर्नाटकमधील रताळे आकाराने मोठे आणि चवीला तुरट असते. त्यामुळे त्या रताळ्यांना तुलनेने कमी मागणी असते.
- अमोल घुले, आडतदार पुणे बाजार समिती
माझी एक एकर रताळी लागवड २६ जानेवारीच्या दरम्यान केली होती. मात्र पाणीटंचाईमुळे चांगले पाणी पिकाला देऊ न शकल्याने उत्पादन घटले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी लागवड केली नसल्याने क्षेत्र घटले. गेल्यावर्षी चांगले उत्पादन होते. दर ३० ते ३५ रुपये होते. हेच दर या वेळी ५५ ते ६० रुपये आहेत.
- कल्याण कोकरे, रिठेवाडी, ता. करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cold Wave: धुळे, जळगाव, जेऊरमध्ये थंडीची लाट; राज्यात तापमान कमी होऊन थंडीचा कडाका वाढला

Safflower Farming: तातडीने करा करडई लागवडीचे नियोजन

Pink Boll Worm: गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Tobacco Farming : जिनेव्हा येथील परिषदेवरून तंबाखू उत्पादकांची संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेत वादाची ठिणगी; प्रकरण काय?

Agriculture Entrepreneur: चारा, बेणे विक्रीतून साधले करिअर!

SCROLL FOR NEXT