Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीतून काँग्रेसच्या जगन्नाथ काळे यांचा अर्ज वैध

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज पणन संचालक मोहन निंबाळकर यांनी सोमवारी (ता. १७) वैध ठरविला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज पणन संचालक मोहन निंबाळकर यांनी सोमवारी (ता. १७) वैध ठरविला. काळे यांचा अर्ज जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी अपात्र ठरवला होता. आता या निर्णयामुळे काळे यांना दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात अधिक बाजार समिती निवडणुकीत जगन्नाथ काळे यांनी सहकारी संस्था मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे हे बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक असून बाजार समिती परिसरात ३५, ३६ व ३७ क्रमांकाचे गाळे मेहेर सीड्सच्या नावावर आहेत, त्यांचे मालक हे जगन्नाथ काळे आहेत.

शिवाय ते जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षही असल्याने त्यांचा शेतकऱ्यांसाठी असलेल्या सहकारी संस्था मतदार संघातील अर्ज अवैध ठरवावा, असा आक्षेप माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी नोंदविला होता.

त्यावर सुनावणी घेत निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी ६ एप्रिल रोजी जगन्नाथ काळे यांचा अर्ज अपात्र ठरवला. त्या विरोधात काळेंनी पणन संचालकाकडे पठाडेंविरोधात दोन अपील सादर केली होती. त्यावर १३ एप्रिल रोजी सुनावणी झाली.

त्यात पठाडे यांच्या बाजूने वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यानुसार पणन संचालकांनी सोमवारी (ता. १७) सुनावणी करण्याचा निर्णय घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत काळे यांचा अर्ज वैध ठरवत जिल्हा उपनिबंधकांचा आदेश रद्दबातल ठरवला.

काळेंच्या नावे नाहीत परवाने

जगन्नाथ काळे यांनी या निर्णयास ॲड. प्रसाद जरारे यांच्यामार्फत आव्हान दिले होते. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत जगन्नाथ काळे यांच्या नावाने बाजार समितीने दुकानाचा एकही परवाना नाही. भाऊसाहेब काळे यांच्या नावावर परवाने आहेत.

मात्र, जगन्नाथ काळे आणि भाऊसाहेब काळे हे एकत्र कुटुंबातील असल्याचा कोणताही पुरावा बाजार समितीने दिला नाही. जगन्नाथ आणि भाऊसाहेब हे विभक्त कुटुंबात राहत असल्याचा पुरावा अपिलकर्त्यानी सादर केला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश फेटाळण्यात येत असल्याचे पणन संचालकांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Decision: मंत्रीमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

Warna Dam Discharge : वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग

Agrowon Podcast: मोसंबीची आवक मर्यादीत; सोयाबीनचा बाजार स्थिरावला, तुरीचा बाजारभाव दबावातच, आल्याचे दर स्थिर तर वांग्याला उठाव

Tomato Diseases: टोमॅटोवरील मर आणि करपा रोगाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT