Pune News: कृषी आयुक्तांच्या मान्यतेविना प्रयोगशाळा उपकरण खरेदीचे कंत्राट वाटण्यासाठी गुणनियंत्रण संचालकाने मर्जीतील अधिकारी उपसंचालकपदी नेमला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. .सव्वादोन कोटी रुपयांचे कंत्राट निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक अशोक किरन्नळी यांनी वाटले आहे. त्यासाठी तत्कालीन प्रयोगशाळा उपसंचालक शरद सोनवणे यांनी मदत केली. खरेदीसाठी ‘पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील सविस्तर प्रकल्प अहवाल’ (आरकेव्हीवाय-डीपीआर) या योजनेचा निधी वापरला आहे..उपकरण खरेदीला शासनाने मान्यता दिली होती. परंतु, श्री. किरनळ्ळी यांनी निविदा प्रक्रियाला आयुक्तांची मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे कोट्यवधींची उपकरणे धूळ खात पडली आहेत. या घोटाळ्यात कारवाई सोडाच, पण साधी चौकशीदेखील होत नसल्याने राज्यातील प्रयोगशाळा निरीक्षक नाराज आहेत..Contract Workers Issue: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात.सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कंत्राट वाटपाची प्रक्रिया शासनाच्या संगणकीय निविदा वाटप (जेम) प्रणालीवर होते. ही प्रक्रिया तत्कालीन उपसंचालक सोनवणे यांनी हाताळली. परंतु, ते ऑगस्ट २०२५ मध्ये निवृत्त होताच गुणनियंत्रण विभागात नाट्यमय घडामोडी झाल्या. उपसंचालक नात्याने कंत्राट वाटपाची प्रणाली हाताळण्याचे वैयक्तिक पासवर्ड सोनवणे यांच्याकडेच ठेवले गेले..तात्पुरते उपसंचालकपद चक्क कनिष्ठ दर्जाच्या अननुभवी अधिकाऱ्याकडे दिले गेले. गुणनियंत्रण विभागात खते, बियाणे तसेच मुख्य बियाणे निरीक्षक असे उपसंचालक दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होते. त्यांना डावलून संचालक किरनळ्ळी यांनी वृषाली देशमुख यांची वर्णी उपसंचालकपदी लावली..Agriculture Department Inquiry: दोन कृषी अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची चौकशी .या विभागात वर्ग एकचे तीन, वर्ग दोनचे चार तसेच श्रीमती देशमुख यांच्या समकक्ष सात असे १४ सेवाज्येष्ठ अधिकारीदेखील गुणनियंत्रण विभागात होते. परंतु, साऱ्यांना डावलून श्रीमती देशमुख यांना पदभार दिला गेला. त्यानंतर कंत्राट वाटले गेले आहे. .‘‘किरनळ्ळी यांनी गुणनियंत्रण संचालकपद मिळवताना स्वतःची सेवाज्येष्ठता पुढे करीत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याच किरनळ्ळी यांनी संचालकपद मिळताच श्रीमती देशमुख यांना नेमताना १४ अधिकाऱ्यांना संशयास्पद डावलले. विशेष म्हणजे पद मिळूनदेखील श्रीमती देशमुख यांच्याकडेही कंत्राट वाटपाचा पासवर्ड नव्हता. मग किरनळ्ळी यांनी कंत्राट वाटलेच कसे, हा मुद्दा उपस्थित होतो. या प्रकरणाचे बिंग फुटताच पुन्हा दुसरा तात्पुरता उपसंचालक नेमला गेला आहे. उपसंचालक नियुक्तीचा हा गोंधळ, कंत्राट वाटपातील हेराफेरी होत असताना वरिष्ठ अधिकारी गप्प बसले होते,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले..घोटाळा दडपणारा ‘आका’ कोणउपकरण खरेदीत अंदाजे ८० लाखांचा घोटाळा झालेला आहे. उपसंचालक सोनवणेंपाठोपाठ आता संचालक किरनळ्ळीदेखील याच महिन्यात निवृत्त होत आहेत. राज्यभर प्रयोगशाळांमध्ये धूळ खात पडून असलेल्या उपकरणांचे नेमके काय करायचे, कंत्राटदाराचे बिल कोणी भरायचे, कंत्राट वाटपासाठी पासवर्ड चोरणारा कोण होता, या घोटाळ्याची चौकशी का होत नाही, तसेच हे सारे प्रकरण दडपणारा ‘आका’ कोण, असे कळीचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कारण, मंत्रालय व आयुक्तालयातील उच्चपदस्थांनी या घडामोडींकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, असे प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे म्हणणे आह.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.