Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण’ योजनेचा १२वा हप्ता जमा, पण अनेक महिला अजूनही प्रतीक्षेत!

Govt Scheme Update: राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा १२ वा हप्ता जमा होण्यास ५ जुलैपासून सुरुवात झाली आहे.

Roshan Talape

Pune News: राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा १२ वा हप्ता जमा होण्यास ५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (ता.४) रात्री उशिरा अधिकृत ट्विटद्वारे दिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले होते की, ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न आहे, अशा लाभार्थिंना थेट बॅेक खात्यांमध्ये निधी जमा करण्यात येईल. त्यानुसार अनेक महिलांना या निधीचा लाभही मिळायला सुरुवात झाली आहे.

मात्र, राज्यातील अनेक महिलांच्या खात्यांमध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. यामागे काही कारणे असल्याचे समोर आले आहे. सरकारकडून सध्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांनी अटी व निकष पूर्ण न करता अर्ज केले आहेत, त्यांचा अर्ज अपात्र ठरवला जात आहे. त्यामुळे पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजना सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीत काही महिलांना अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती, कारण त्या वेळी त्यांचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले नव्हते. आता त्या वयोगटात आल्या असल्या तरी, सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.

याशिवाय, काही महिलांना अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले, तर काहींना पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्यामुळे किंवा वेळेअभावी अर्ज करता आला नाही. परिणामी, अशा अनेक पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

सरकारकडून नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे राज्यभरातील हजारो महिलांचे लक्ष लागले आहे. काही महिलांना मागील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत नियमितपणे पैसे मिळाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना निधी वेळेवर मिळत नाही, त्यामुळे नाराजी वाढत आहे. सरकारने लवकरच नवीन अर्ज सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पैसे आलेत का हे कसे तपासाल?

१. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जा.

२. ‘अंतिम यादी’ (Final List) या विभागावर क्लिक करा.

३. तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व कॅप्चा कोड टाका.

४. मोबाईलवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) टाका.

५. तुमचं नाव यादीत आहे की नाही हे स्क्रीनवर लगेच दिसेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT