Thane Bandh Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ठाणे बंद , 16 सप्टेंबरला मराठवाडा चक्क जामची हाक

Swapnil Shinde

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत असून त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक दिली आहे. तसेच जालना जिल्ह्यात गावागावांमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी जरांगेची मनधरणी करीत आहे. परंतु जरांगे आपल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला देण्याची मागणी करत आहेत. तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले.

त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही मराठा समाजाच्यावतीने आज बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सर्व मराठा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शहर आणि बाजारपेठेतील दुकाने बंदल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

त्याचबरोबर जालना शहर आणि जिल्ह्यातील गावागावांमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास येत्या 16 सप्टेंबर रोजी संपुर्ण मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिली आहे. मराठा आंदोलनाचे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT