Soybean Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : घरच्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासा

Soybean Production : सोयाबीन हे स्वयंपरागसिंचित पीक असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील स्वउत्पादित बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच त्याचा पेरणीसाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Team Agrowon

Dhule Soybean News : सोयाबीन हे स्वयंपरागसिंचित पीक असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील स्वउत्पादित बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच त्याचा पेरणीसाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी बियाण्याची घरच्या घरी उगवणक्षमता तपासणी करून घ्यावी. बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्के असेल तरच पेरणी करावी. ज्या प्रमाणात बियाण्याची उगवणक्षमता येईल त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याचा प्रतिहेक्टर वापर करणे योग्य ठरेल.

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखून ठेवावे. स्वत:ची गरज भागवूनदेखील बियाणे शिल्लक राहत असेल तर शिल्लक बियाणे आपल्या मित्रमंडळींना, नातेवाइकांना पेरणीसाठी दिल्यास घेणाऱ्या व देणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल, असा आशावाद तडवी यांनी व्यक्त केला.

अशी घ्या काळजी

शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यांतील शेंगा, फोलकटे, काडीकचरा, माती, खडे इत्यादी काढून स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलावाविरहित व हवेशीर असले पाहिजे याची काळजी घ्यावी.

साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठविताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे.

बियाणे १०० किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये, अन्यथा सर्वांत खालच्या पोत्यातील बियाण्यांवर जास्त वजन पडून बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.

पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT