Climate Health Impact: जनआरोग्याला संसर्गजन्य रोगाचा नेमका किती धोका आहे, याची पडताळणी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) नुकतीच केली आहे. या संशोधनात्मक अभ्यासातून भारतीयांमध्ये संसर्गजन्य (प्रामुख्याने विषाणूजन्य) आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे..वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत संसर्गजन्य रोगाचे १०.७ टक्के असलेले प्रमाण दुसऱ्या तिमाहीत ११.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आपल्या देशात ऋतू पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असा कोणताही असो सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासह हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, अतिसार, टीबी आदी संसर्गजन्य रोगाने देशातील जनता मुळातच त्रस्त होती. त्यात आता मागील दीड-दोन दशकांपासूनच्या बदलत्या हवामानात या आजारांचा ताप जरा अधिकच वाढला आहे..Rabies Disease: रेबीज आजाराबाबत शंकासमाधान....संसर्गजन्य आजारास कारणीभूत जिवाणू, विषाणू, बुरशी हे सूक्ष्मजीव असले, तरी त्यात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग झपाट्याने होतो. वातावरणातील बदलाबरोबर अस्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांचा अभाव ही ग्रामीण भागात तर शहरांमध्ये गजबजलेली ठिकाणे, वाढते नागरिकरण, प्रदूषण ही संसर्गजन्य आजाराची लागण होऊन झपाट्याने पसरण्याची प्रमुख कारणे आहेत..बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग हे आजार जडतात. हे घटक संसर्गजन्य आजारास थेट कारणीभूत नसले तरी यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती घटते. अशा व्यक्तीस संसर्गजन्य रोगाची लागण लवकर होते..ग्रामीण भागातील जनतेसाठी जिल्हा, तालुका आणि मोठे गाव पातळीवर अनुक्रमे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशी व्यवस्था आहे. परंतु अस्तित्वात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व रुग्णालयांची संख्या ही ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी आहे. या तिन्ही ठिकाणी रोगनिदानापासून ते उपचारापर्यंतच्या आवश्यक सोईसुविधांचा अभाव दिसून येतो..Animal Infectious Diseases : जनावरांतील संसर्गजन्य आजारांवर उपचार....शिवाय चांगल्या डॉक्टरांची येथे वानवा आहे. तिथे ना धड निदान होते, ना उपचार! त्यामुळे ग्रामीण भागातील ८० टक्के रुग्ण सेवा ही खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाते, जी प्रत्येकालाच परवडेल असे नाही. संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जाणीव जागृतीची गरज आहे..कोरोनासारख्या महाभयंकर संकटातून आपण संसर्गजन्य आजार टाळण्याबाबत काहीही बोध घेतलेला दिसत नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे याबरोबर पोषक आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम यामुळे बहुतांश संसर्गजन्य आजार टाळले जाऊ शकतात. परंतु हे खबरदारी सध्या किती जण घेतात, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो..वैयक्तिक पातळीवरची खबरदारी तसेच वेळेवर निदान आणि योग्य उपचाराने संसर्गजन्य आजाराला दूर ठेवता येते. त्याकरिता ग्रामीण तसेच शहरी भागात रोगनिदान आणि उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. राज्यातून संसर्गजन्य आजारांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार एक विशेष कृती दल दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे..या उपक्रमामुळे संपूर्ण राज्यात संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सुसंगत, वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला गेला. हे कृती दल तत्काळ कार्यान्वित होऊन त्याचे अपेक्षित दृश्यपरिणाम समोर यावेत, हीच अपेक्षा!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.