Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Parking Tender : वाहनतळ ठेक्यासाठी तीव्र स्पर्धा, गुंडगिरी पोसण्याचा प्रकार

Pune Parking Tender Issue : पुणे मनपा मध्येही भाजपाच्या कामगार आघाडीच्या एका नेत्याने गावगुंडाना सोबत घेत महिला अधिकाऱ्यांवर अरेरावी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

गणेश कोरे

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहनतळ ठेक्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. हा ठेका आपल्याच कार्यकर्त्याला मिळण्यासाठी सत्तारूढ पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी संचालकांवर दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

याबाबात समजलेल्या माहितीनुसार संचालक मंडळ आल्यापासून विविध कामांसाठी ठेकेदारी फोफावली आहे. काही संचालकांनी विविध भाग वाटून घेत, मालकी हक्क दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने समितीच्या आवारातील रिकाम्या जागांवर ताबा मारणे, त्याठिकाणी वाहनतळ उभारून गुंडांची सोय करणे असे प्रकार सुरू आहे.

आता तर थेट एका वाहनतळाच्या ठेक्‍यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यासाठी सत्तेतील पक्षातील दोन लोकप्रतिनिधींनी आपल्याच कार्यकर्त्यांना ठेका द्यावा यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. तर लोकप्रतिनिधींचे सोन्याने मढलेले कार्यकर्ते घोळक्याने बाजार समितीत येत असून, प्रशासनावर दबाव टाकत आहेत. अशा प्रकारांमुळे गुंडगिरी बाजार समितीमध्ये रूजविली जात असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

अधिकाऱ्यांवर अरेरावी

पुणे मनपा मध्येही भाजपाच्या कामगार आघाडीच्या एका नेत्याने गावगुंडाना सोबत घेत महिला अधिकाऱ्यांवर अरेरावी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर मनपा आयुक्तांनी संबंधित कामगार नेत्याला मनपा मध्ये प्रवेश बंदी केली आहे. अशीच प्रवेश बंदी बाजार समिती प्रशासन वाहनतळ ठेकेदारीसाठी टोळीने येणाऱ्या गावगुंडाना घालणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शेतकरी संघटनांचे आरोप

बाजार समित्या या गुडंगिरी, राजकारणाचे अड्डे होत असून शेतकऱ्यांचे कत्तलखाने असल्याचा आरोप सातत्याने शेतकरी संघटनांचे नेते करत आहेत. याला सध्याच्या कार्यपद्धतीमुळे दुजोरा मिळत आहे. काही वर्षांपूर्वी बाजार समितीमध्ये गुंडाकडून शेतकऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रकार झाला होता. तर मुंबई बाजार समिती मध्ये एका अधिकाऱ्यांचा गोळ्या झाडून खून झाला होता. याप्रकरणी कायदेशीर कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कामगार दहशतीखाली, युनियनचे प्रशासनाला पत्र

बाजार समितीचे संचालक असलेले कामगार नेते संतोष नांगरे यांच्या संघटनेने बाजार आवारातील गुंडगिरी बाबत प्रशासनाला पत्र देत, घराचा आहेर दिला आहे. बाजार आवारात रात्री अपरात्री बाहेरील गुंडगिरी करणारी मुले बाजार आवारात येऊन, कामगार, वाहनचालक यांना दमदाटी, मारहाण करून दहशत निर्माण करत असल्याबाबतचे पत्र दिले आहे. या मुलांवर कारवाई करावी अन्यथा बाजार बंद करण्याचा इशारा दिला आहे.

मुळशी पॅटर्नची चर्चा

काही वर्षांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे चित्रीकरण बाजार आवारात झाले. चित्रपटात बाजार समितीमधुनच गुंडगिरी कशी फोफावते याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या गुंडगिरीची अंमलबजावणी आता काही लोकप्रतिनिधींद्वारे सुरू असून, मुळशी पॅटर्नच्या अंमलबजावणीतून गुंडगिरी पोसण्याचे प्रकार वाहनतळ ठेकेदारीतुन सुरू होत, असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

SCROLL FOR NEXT