Pune APMC: बाजार समितीचा गैरव्यवहार अधिवेशनात उपस्थित होणार

Assembly Monsoon Session: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल सत्ताधारी आमदारांनी गांभिर्याने घेतली आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल सत्ताधारी आमदारांनी गांभिर्याने घेतली आहे. जिल्ह्यातील विविध चार आमदारांनी गैरव्यवहारप्रकरणी सोमवारी (ता.३०) सुरू होत असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्‍न विधिमंडळाकडे सादर केल्याचे समजते. यामधील गंभीर प्रश्‍न स्वीकृत झाले असल्याची माहिती असून, संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

बाजार समितीवर संचालक मंडळ नियुक्त झाल्यावर अनेक गैरव्यवहारांची चर्चा बाजार आवारात रंगली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे, एकाऐवजी अनेक सुरक्षा एजन्सींची नियुक्ती, वाहनतळाचे ठेके, विविध निविदा, सेस चोरी प्रकरणे आदी विविध गैरव्यवहारांच्या चर्चेने बाजार समिती सातत्याने चर्चेत आहे.

Pune APMC
Pune APMC: निंबाळकर समितीचा चौकशी अहवाल दाबण्याचा खटाटोप

या प्रकरणी जिल्ह्यातील सत्ताधारी चार आमदारांनी यांची गंभीर दखल घेत, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न विचारण्याची जय्यत तयारी केल्याचे समजते. यामधील विविध प्रश्‍न स्वीकृत झाले असल्याची माहिती असून, या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी बाजार समिती प्रशासनाची धांदल उडाली आहे.

दरम्यान, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यापूर्वीच बाजार समितीच्या कामकाजावर गंभीर आरोप करत, बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात बाजार समितीचा गैरव्यवहार उपस्थित केला जाणार आहे.

Pune APMC
APMC Cess Controversy: सेस रद्द केल्यास बाजार समित्यांना टाळे लागतील

तीन कोटींच्या रंगरंगोटीची निविदा बासनात

एका संचालकांच्या सुपीक डोक्यातून संपूर्ण बाजार समितीच्या रंगरंगोटीची तीन कोटींची निविदा काढण्याची चर्चा बाजार आवारात होती. मात्र ही चर्चा समोर आल्यावर एकीकडे स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या इमारती पाडण्याची शिफारस झाली असताना पुनर्विकासाची चर्चा सुरू आहे. यातच बाजार समितीच्या खर्चाने रंगरंगोटी करून, शेतकऱ्यांचे कोणते हित साधले जाणार अशी चर्चा झाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द झाल्याचे समजते.

संचालक पद सेवेचे, वसुलीचे नाही

संचालक पदाच्या निवडणुकीत आम्ही काही कोटी रुपये खर्च केले ते आता आम्ही वसूल करतो आहे, अशी निर्लज्ज कबुली काही संचालकांनी दिली होती. याबाबत काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर असलेल्या पणनमंत्री जयकुमार रावल यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता, संचालक पद हे सेवेचे असून, वसुलीचे नाही असे सांगून संचालकांचे कान टोचले होते. तरीही संचालकांच्या कामकाजात फरक पडलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com