Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : दहा ‘एसएओं’ना सहसंचालकपदी पदोन्नती

Promotion of Agriculture Officers : पदोन्नतीमुळे आता कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाचे सहसंचालकपद कृषी खात्याने ताब्यात घेत तेथे गणेश काशिनाथ घोरपडे यांची नियुक्ती केली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील दहा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या अखेर मार्गी लागल्या आहेत. पदोन्नतीमुळे आता कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाचे सहसंचालकपद कृषी खात्याने ताब्यात घेत तेथे गणेश काशिनाथ घोरपडे यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या (एसएओ) पदोन्नतीचे प्रस्ताव रखडले होते. विशेष म्हणजे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व एसएओंना बाजूला सारून केवळ विवेक सोनवणे यांनाच चक्क निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती दिली गेली. त्यामुळे इतर अधिकारी नाराज झाले होते. रखडलेल्या बढत्यांचे आदेश कृषी खात्याच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी बुधवारी (ता.२५) जारी केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

आस्थापना विभागाचे सहसंचालकपद अतिशय महत्त्वाचे समजले जाते. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चौकशा, बदल्या, निलंबन, बडतर्फी आणि नेमणुकांमध्ये सहसंचालक कार्यालयाचा पत्रव्यवहार कळीचा ठरतो. सहसंचालक थेट कृषी आयुक्तांच्या अखत्यारित काम करतो. आतापर्यंत या पदावर कृषी खात्यातील नियमित अधिकारी नियुक्त केला जात नव्हता. श्री. घोरपडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत सहसंचालक म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. सध्या ते पुणे विभागाच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सांभाळत होते.

शिवराज अरुणकुमार घोरपडे यांना नागपूरच्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या (सामेती) व्यापारक्षम शेती व्यवस्थापनाचे अप्पर संचालकपद देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक उदय अण्णासाहेब देशमुख यांची बढती आता स्मार्ट प्रकल्पाच्या अतिरिक्त प्रकल्प संचालकपदी झाली आहे. मुंबईतील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कृषी व्यवसाय विशेषज्ञ डॉ. मेघना मंदार केळकर यांची कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण कक्षाच्या ३ मधील सहसंचालकपदी बढतीवर नियुक्ती झाली आहे.

कृषी खात्यात जेडीए, अर्थात विभागीय कृषी सहसंचालकपद हे संचालकांखालोखाल मोलाचे समजले जाते. फलोत्पादन मंडळात उत्तम कामगिरी बजावणारे सुभाष महादेव काटकर यांना नाशिकच्या ‘जेडीएं’पदाची लॉटरी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्टचे समन्वयक अधिकारी उमेश रमाकांत घाडगे यांच्याही पदरात नागपूरचे ‘जेडीए’पद पडले आहे. कोल्हापूर स्मार्टचे समन्वयक अधिकारी उमेश गोपाळ पाटील यांनी कोल्हापूरचे ‘जेडीए’पद पटकावले आहे. एकाच जिल्ह्यात बढतीवर चांगल्या पदावर नियुक्ती मिळवल्याचे श्री. पाटील यांचे कसब चर्चेत आहे.

स्मार्टमधील धोरण विश्लेषक शिवाजी श्रीरंग जगताप यांची ‘सामेती’च्या अपर संचालकपदी पदोन्नती झाली आहे. जळगावच्या ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक रविशंकर बाबूराव चलवदे आता कृषी आयुक्तालयातील नियोजन व अंदाजपत्रक कक्षाचे सहसंचालकपद सांभाळणार आहेत.

कोळपकरांकडे जैविक मिशनची जबाबदारी

कृषी विस्तारात सातत्याने नवे प्रयोग राबविणारे नवनाथ मुरलीधर कोळपकर यांना अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे सहसंचालकपद मिळाले आहे. ते सध्या धुळ्याला आत्माचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT