Maharashtra MIDC  Agrowon
ॲग्रो विशेष

Defense Manufacturing Project : अमरावतीत संरक्षण सामग्री निर्मितीचा प्रकल्प

Amaravati MIDC : अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या टेम्बो डिफेन्स कंपनीचा प्रकल्प शंभर एकर जागेवर साकारणार आहे.

Team Agrowon

Amaravati News : अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या टेम्बो डिफेन्स कंपनीचा प्रकल्प शंभर एकर जागेवर साकारणार आहे. या कंपनीला जमीन देण्याचे राज्य सरकारने मान्य केले असून, याला एमआयडीसीचाही होकार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अमरावती इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून यासंदर्भात संबंधित कंपनीचा महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार झाला असल्याचे सांगितले. टेम्बो डिफेन्सेस या कंपनीला राज्य शासनाने नागपूर तसेच अमरावतीत या प्रकल्पासाठी जागा पाहण्यास सांगितले होते.

त्यांना अमरावतीची जागा आवडल्याने ती निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पासाठी किमान शंभर एकर सलग जागा हवी होती. ती अमरावतीच्या नांदगावपेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये उपलब्ध आहे.

टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टेम्बो डिफेन्सेसला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) जमीन वाटपासाठी एक पत्र मिळाले असल्याचे कंपनीनेच सांगितले आहे.

टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज औद्योगिक, व्यावसायिक, उपयुक्तता आणि मूळ उपकरणे उत्पादकांसह विविध प्रतिष्ठानांसाठी पाइप सपोर्ट सिस्टम, फास्टनर्स, अँकर, सी, अँटी-व्हायब्रेशन सिस्टम आणि उपकरणांसाठी धातूच्या घटकांचे उत्पादन व असेंब्ली तयार करते.

या नवीन सुविधेमुळे टेम्बो डिफेन्सन्सेची भारताच्या संरक्षण क्षेत्राला पाठिंबा देण्याची क्षमता वाढेल. देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत या दोन्ही उपक्रमांतर्गत स्वयंपूर्णतेच्या सरकारच्या मोहिमेत योगदान राहील, असे कंपनीने म्हटले आहे.

नांदगावपेठच्या एमआयडीसीमध्ये टेम्बो डिफेन्सेस या कंपनीला शंभर एकर जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. ही कंपनी अमरावतीत आल्याने देशासाठी संरक्षण साहित्याची तसेच रोजगाराची निर्मिती होणार आहे. अंदाजे अडीचशे ते ३०० तिनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात विविध प्रकारच्या गोळ्या (बुलेट) तयार करण्यात येतील अशी माहिती आहे.
- किरण पातूरकर अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशन, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Daughter Wedding Story: उद्या मुलीचं लग्न आहे, कुणीतरी माझा शेतीमाल खरेदी करा

Irrigation Subsidy: ठिबक, तुषार योजनांच्या अनुदान प्रक्रियेतील त्रुटी दूर करा

Dry Fruit Price: नागपुरात सुकामेवा महागला

Grape Export Loss: द्राक्ष निर्यातीला २५ कोटींचा फटका

Watermelon Price: खानदेशात कलिंगड दर घसरले

SCROLL FOR NEXT