Sangli Bribe Case agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Bribe Case : शेतीच्या कामासाठी मंडल अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना अटक

sandeep Shirguppe

Sangli Bribe Case : शेत जमिनीची नोंद करण्याठी सात हजार रुपये स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील मंगळवार (ता.०१) केलेल्या कारवाईत मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले, कोतवाल प्रवीण प्रकाश माने आणि खासगी इसम दत्तात्रय ऊर्फ संभाजी बाबर या तिघांना लाच घेताना पकडले. याबाबत तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वायफळे येथील एकाने जमीन खरेदी केली होती. या खरेदीची दस्तनोंदणी करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. या अर्जाची सुनावणी मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्यासमोर सुरू होती.

याप्रकरणी अर्जदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी वाले यांनी संभाजी बाबर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये तक्रारदाराने सात हजार रुपये देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची शहनिशा करून सापळा रचण्यात आला होता.

१ ऑक्टोबर मंगळवारी मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्या सांगण्यावरून लोकसेवक कोतवाल प्रवीण प्रकाश माने याने सात हजार रुपयांची लाच घेत असताना पंचांसमक्ष त्यांना लाच घेताना पकडण्यात आले. वाले, माने आणि बाबर यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उमेश पाटील यांच्यासह पोलिस पथकाने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

Onion Subsidy : राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Rabbi Season : रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य

SCROLL FOR NEXT