Voter List Agrowon
ॲग्रो विशेष

Nandurbar APMC Election : तळोदा बाजार समितीच्या सुधारित मतदारयादीमुळे चुरस वाढणार

Nandurbar Election : निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या.

Team Agrowon

तळोदा, जि.नंदुरबार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक (Agriculture Produce Market Committee Election) कार्यक्रम नुकताच नव्याने जाहीर करण्यात आला असून, २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

मतदानानंतर (Voting) पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते, व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती.

तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ट होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.

त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले होते.

त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने पाठविली होती. त्यानंतर प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT