Kunbi Record Agrowon
ॲग्रो विशेष

Kunbi Certificate : नोंदीच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरे घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता. २०) मुंबईकडे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे.

पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मांत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांना दिले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता. २०) मुंबईकडे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ज्या मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना अद्याप प्रमाणपत्रे मिळाली नसल्याची बाब जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत आदेश दिले आहेत.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी - मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समितीस विविध जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० तसेच नियम २०१२ व त्याअंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी.

याद्या गावस्तरावर प्रसिद्ध कराव्यात

ज्यांच्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात याव्यात. जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील.

कुणबी प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे

कुणबी जात प्रमाणपत्राकरिता अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शपथपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी स्वयंघोषणापत्र, टीसी, शिधापत्रिका, सात बारा (तहसील कार्यालय), नमुना नंबर ३३ (भूमी अभिलेख) पाहणी पत्रक (तहसील कार्यालय), पक्का बुक (भूमी अभिलेख), शेतवार पत्र (भूमी अभिलेख), वंशावळ (कागदपत्रे जुळणारी) सादर करावी लागणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT