Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ताकारी योजना अखेर सुरू

Koyna Dam : मागील महिन्यात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार यंदाचे रब्बीचे पहिले ताकारी आवर्तन १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर सोडण्याचे निश्चित झाले होते.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील भाजप- शिवसेना (शिंदे गट) आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यातील राजकीय श्रेयवादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्ती करून पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यामुळे कोयना धरणातून बंद केलेले पाणी पुनश्चः सोडल्याने ताकारी योजना दोन दिवसापूर्वी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे.

मागील महिन्यात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार यंदाचे रब्बीचे पहिले ताकारी आवर्तन १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर सोडण्याचे निश्चित झाले होते.

परंतु कृष्णा नदीत आवश्यक पाणीपातळी न मिळाल्याने हे पाणी उशिरा (ता.६ नोव्हेंबर) सुरु झाले. त्यानंतर काही राजकीय हस्तक्षेपामुळे कोयना धरणातून पाणी सोडणे बंद केले. परिणामी २१ नोव्हेंबरला ताकारीचे बहुतांश पंप बंद करावे लागले. यानंतर कोयनेतून पुनश्चः पाणी सोडण्यासाठी दोन जिल्ह्यातील सत्ताधा-यांत राजकीय स्टंटबाजी झाली.

चार दिवसांपूर्वी कोयनेतून २१०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दोन दिवसांपूर्वी साटपेवाडी बंधाऱ्यात पोहचल्यानंतर टप्पा १ व २ वरील ११ पंप सुरू करण्यात आले आहेत.

टप्पा ३ वरील २ पंपाचे पाणी सोनहिरा खोऱ्यात सोडले असून टप्पा ४ वरील २ पंपांचे पाणी तडसर परिसरांकडे वळविण्यात आले आहे. कडेगाव ,खानापूर, तासगाव, पलूस तालुक्यांतील पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT