Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे ‘धरणे’

Farmers Issue : एकीकडे शेती व्यवसाय दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी करून शेतीमालाचे भाव पाडत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १८) धरणे देण्यात आले.

एकीकडे शेती व्यवसाय दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. शेतीमध्ये घातलेला उत्पादन खर्चही भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

अशावेळी सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा, थकित पीकविमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान, असे अनेक प्रश्‍न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत, असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार, जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील वेताळ यांच्यासह स्वतंत्र भारत पक्षाचे रशीद मामू, भाऊसाहेब पाटील गायके, जगन्नाथ पाटील काकडे, सोन्याबापू पाटील बोडके, दगडू पाटील बोडके, सुनील अण्णा जाधव आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचा संबंध निवेदनही देण्यात आले.

...या आहेत मागण्या

शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवा व शेतीमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करा

सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या

शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा द्या

वन्य प्राण्यांकडून होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करा, पीकविम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा. विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अमलात आणा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming: नंधाना गावाची नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे शाश्वत वाटचाल

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Onion Farming: कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार व्यवस्थापन फायदेशीर

Gold Silver Price Today: सोने- चांदी दरात घसरण, आजचा प्रतितोळ्याचा दर काय?

Farmers Crisis: मळणीला आला वेग; अतिवृष्टीने घटला तुरीचा उतारा

SCROLL FOR NEXT