M S Swaminathan Agrowon
ॲग्रो विशेष

M. S. Swaminathan : स्वामिनाथन यांचे काम म्हणजे क्रांतिकार्यच...

Swaminathan Commission : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी नुकताच या जगाचा निरोप घेतला. त्यांचे आयुष्य म्हणजे उत्तुंग कर्तृत्वाचा नमुना. असे जगता आले पाहिजे.

संजीव चांदोरकर

Latest Agriculture News : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी नुकताच या जगाचा निरोप घेतला. त्यांचे आयुष्य म्हणजे उत्तुंग कर्तृत्वाचा नमुना. असे जगता आले पाहिजे. शेवटचे काही दिवस सोडले, तर वयाच्या ९८ वर्षापर्यंत कार्यरत, पाय रोवून एकाच क्षेत्रात केलेले दशकानुदशके टिकणारे काम, स्वतःचे नाव झाल्यावर उगाचच आपल्याशी संबंधित नसलेल्या विषयावर तज्ज्ञांच्या भूमिकेतून भाष्य न करणे, शेकडो कोटी लोकांच्या आयुष्याला- फक्त भारतातीलच नाही तर इतर देशांतीलही- स्पर्श करणारे काम...असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी पैलू सांगता येतील.

भारतातील भुकेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सोडविण्यासाठी दोन गोष्टींची गरज होती आणि अजूनही आहे ः

१) अन्नधान्याची उपलब्धता वाढविणे. त्यासाठी नवीन वाण, बी-बियाणे, शेतीपद्धती याविषयीचे संशोधन गरजेचे असते.

२) अन्नधान्याची पोलिटिकल इकॉनॉमी (बाजारभाव, हमीभाव, क्रयशक्ती इत्यादी) जनकेंद्री करणे गरजेचे असते.

पहिले काम डॉ. स्वामिनाथन यांच्यासारखे अनेक कृषी शास्त्रज्ञ आणि त्यांनी तयार केलेल्या संशोधकांच्या पिढ्या, संशोधन संस्थांनी करून दाखवले. या कामाचा पाया त्यांनी घातला.

दुसरे काम मात्र देशाच्या राजकीय नेतृत्वाचा विशेषाधिकार आहे. त्यात शास्त्रज्ञ/ डोमेन नॉलेजवाल्यांना आपोआप अधिकार मिळत नाही. राजकीय नेतृत्व हा अधिकार कसा आणि का वापरत आहे, त्यातून नक्की कोणाचा फायदा होतो आहे, हे आपण जवळून बघतच आहोत. या राजकीय नेतृत्वाचा प्रतिवाद फक्त जनकेंद्री/ शेतकरीकेंद्री राजकीय शक्तीच करू शकतात. त्यासाठी अन्य कोणता शॉर्टकट नाही.

जागतिक धान्य बाजारावर चार-पाच बहुराष्ट्रीय कंपन्यांची जबरदस्त पकड आहे. देशांना अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी बनवणे ही त्यांना सतत धंदा मिळण्याची पूर्वअट आहे. त्यासाठी या कंपन्या, जागतिक भांडवल लाखो हेक्टर जमिनीवर ताबा मिळवतात.

त्याला इंग्रजीत लँड ग्रॅबिंग असं म्हटलं जातं. ही मंडळी कमोडिटी एक्स्चेंजवरून भवपातळी वर-खाली करतात, देशातील अन्नधान्याशी संबंधित कायदे, वित्तपुरवठा, पायाभूत सुविधा शेतकरी विरोधी राहाव्यात यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अगदी सत्ताबदलही त्यांना वर्ज्य नाही.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीविरुद्ध राजकीय टीका करणे, जनशिक्षण करणे हा एक भाग झाला. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांना एखादा देश ‘जा फूट’ असं कधी म्हणून शकतो? त्या देशाकडे अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णता असेल तर. डॉ. स्वामिनाथन यांच्यासारखे शास्त्रज्ञ ती ताकद देशाला मिळवून देत असतात.

म्हणूनच त्यांचे कार्य हे समाजबदलासाठी क्रांतिकार्य करण्याएवढे मोठे आहे. तरुणांना आवाहन ः आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञता (एक्स्पर्टीज) मिळवा, उद्या क्रांती केलीत तरी ‘डोमेन एक्स्पर्ट'ना पर्याय असणार नाही, तो कधीच नसतो. शास्त्रीय, राजकीय भूमिका ही ताकदीला पर्याय नसते; त्यामुळे ताकद कमवावी लागते. त्यावर लक्ष द्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT