Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Insurance : केंद्र सरकारच्या हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टिम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nanded News : जागतिक हवामान संस्थेच्या निकशाप्रमाणे स्वयंचलित हवामान केंद्राची उंची २ मीटरऐवजी १० मीटर करण्यात यावी. त्यामुळे केंद्र सरकारच्या हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टिम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत व महसूल मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राची उंची १० मीटर करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांचे फेटाळलेले दावे, या पार्श्‍वभूमीवर भविष्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याच्या रकमेची भरीव नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, प्रा. संदीप देशमुख बारडकर, बालाजी हेंद्रे, अनुराग आठवले यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टिम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षे असून त्यास दोन वर्षांपर्यंत मुदतवाढ देता येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे.

जागा ही शासकीय असावी. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया शासन निर्णय अन्वये करावयाची असल्याने प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याकरिता तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करताना जागतिक हवामान संस्थेच्या निकषाप्रमाणे स्वयंचलित हवामान केंद्राची उंची २ मीटरच्या ऐवजी, १० मीटर करण्यात यावी. जागतिक हवामान संस्थेनुसार १० मीटर उंची ही मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य मोजणी करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो.

त्यामुळे जागतिक हवामान संस्थेच्या निकषानुसार केंद्राच्या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत व महसुल मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राची उंची १० मीटर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT