Sustainable Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture : शाश्‍वत शेती व्यवसाय काळाची गरज

Agriculture Education : आधुनिकतेकडे निघालेल्या आजच्या युवा पिढीला संघर्ष, त्याग, समाजहित, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव जागृती होणे काळाची गरज आहे.

Team Agrowon

Akola News : आधुनिकतेकडे निघालेल्या आजच्या युवा पिढीला संघर्ष, त्याग, समाजहित, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव जागृती होणे काळाची गरज आहे. यासाठी विदर्भाचे थोर सुपुत्र डॉ. पंजाबराव शमुख यांच्या जीवनपटाचे वाचन, चिंतन, मनन आणि अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच शाश्‍वत उत्पन्न देणारा फायदेशीर शेती व्यवसायच काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

कृषिक्रांतीचे प्रणेते पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेश मिरगे म्हणाले, की पंजाबराव देशमुखांचे शैक्षणिक, शेतीविषयक, सामाजिक व राजकीय योगदानाचे मोल लक्षात घेता ते केवळ विदर्भ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला भूषण आहेत.

शाश्‍वत ग्रामविकासासाठी भाऊसाहेबांचे कार्य मौलिक असून आम्ही सर्वांनीच भाऊसाहेबांनी उभारलेले कृषी व शिक्षणाचे हे वैभव अधिक वृद्धिंगत करीत प्रत्येक गाव खेड्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार करावा. ग्रामीण भागाच्या निर्मितीत दिलेले योगदानच भाऊसाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. ययाती तायडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. राजेंद्र काटकर यांच्यासह वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाची सभागृहात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उंदीरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे यांनी तर कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT