Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Girish Mahajan : धुळ्यातील पीक नुकसानग्रस्तांसाठी तत्पर : महाजन

Team Agrowon

Dhule Crop Damage Report News : धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी (Unseasonal Rain) व गारपिटीशी सामना करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारा व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ७१७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली.

या शेतकऱ्यांसाठी सहा कोटी ७५ लाख ९८ हजारांचा निधी १० एप्रिलच्या शासन निर्णयान्वये मंजूरही केला आहे. ही मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.

चालू महिन्यातही गारपीट, वादळामुळे शेतपिकांचे, घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाला दक्षतेचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तेथे तहसील, कृषी कार्यालयाचा प्रतिनिधी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT