Onion Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop damage Survey : नगर जिल्ह्यात नुकसानीच्या पंचनाम्याला होतोय उशीर

Crop Damage : नगर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्याला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असला तरी अजूनही नेमके नुकसान किती झाले याचा आकडा कृषी विभागाकडे नाही.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन-तीन दिवस झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने नुकसानीचे सरसकट पंचमाने करण्याचे आदेश दिले.

मात्र नगर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्याला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असला तरी अजूनही नेमके नुकसान किती झाले याचा आकडा कृषी विभागाकडे नाही.

जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन दिवस जोरदार पाऊस, गारपीट, वादळ झाले. यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झालेले असून प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी जमा केली जात आहे. या मॉन्सूनोत्तरमुळे प्रामुख्याने कांदा, कापूस, मका, भात यासह द्राक्षे, पेरू, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रारंभीच्या काळात साधारण पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यात सर्वाधिक फटका पारनेर, अकोले तालुक्याला बसल्याचे सांगितले गेले.

नुकसानीत प्रामुख्याने कापूस, भात, द्राक्ष, सोयाबीन, मका, तूर, बाजरी, केळी, ज्वारी, कांदा, केळी, मका, पेरू, डाळिंब, पपई, सीताफळ, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे. मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळ आणि गारपिटीने पशुधनाचा तसेच घरांचे व अन्य साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याला आता आठ दिवसाचा अवधी झाला. मात्र अजूनही कृषी विभागाकडे नुकसानीचा नेमका आकडा नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभिर्याने आदेश देऊनही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला दिरंगाई होतेय का? त्याकडे कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT