Sugarcane Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : गडहिंग्लजला ऊस लागवडीत दोन हजार हेक्टरची वाढ

Sugarcane Farming : गतवर्षीच्या पावसाने मध्यम व लघू पाटबंधारे तलाव तुडुंब भरले. त्याचा परिणाम ऊस क्षेत्र वाढण्यावर झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : गतवर्षीच्या पावसाने मध्यम व लघू पाटबंधारे तलाव तुडुंब भरले. त्याचा परिणाम ऊस क्षेत्र वाढण्यावर झाला आहे. तालुक्यात साधारण दोन हजार हेक्टरमध्ये ऊस वाढला असून त्याप्रमाणात उत्पादन वाढणार आहे. या पिकाच्या वाढीने खरीप हंगामातील भात, भुईमूग व इतर पिकांच्या लागवडीत घट येण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

तालुक्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ऊस तर दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक सोयाबीनला प्राधान्य दिले जाते. उसाच्या बरोबरीने सोयाबीनच्या क्षेत्राने मजल मारली आहे. त्यानंतर भात, भुईमूग, मका, ज्वारी आदी पिकांचा क्रमांक लागतो.

२०२३ मधील पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गतवर्षी उसाचे क्षेत्र स्थिर राहिले. शिवाय २०२४ मधील अतिपावसाने उसाच्या उत्पादनात कमालीची घट आली. क्षेत्र वाढले पण उत्पादन घटल्याने यंदा कारखान्यांचे गाळपही २५ ते ३५ टक्क्यांनी कमी झाले. दरम्यान, कारखानदारांचे लक्ष आता पुढील गळीत हंगामावर केंद्रित झाले आहे.

दरम्यान, गतवर्षी जोरदार पावसाने चित्री, आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला या मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील वैरागवाडी, नरेवाडी, तेरणी, शेंद्री, करंबळी, कुमरी, येणेचवंडी हे लघू प्रकल्प शंभर टक्के भरले. नव्या ऊस लागवडीला हे मुबलक पाणी उपयुक्त ठरले.

परिणामी या लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात बहुतांश ठिकाणी, हिरण्यकेशी व घटप्रभा नदीच्या काठावर तसेच उचंगीच्या तारओहोळ तर आंबेओहोळच्या ओढ्याच्या काठावरील क्षेत्रात नवीन उसाची लागवड वाढली आहे. परिणामी, उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने या वाढलेल्या उसाने आर्थिक गोडवाही वाढीस मदत मिळणार आहे.

तोडणी व वाहतूकदारांतही वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे आनंदाचे वातावरण असले तरी मॉन्सूनच्या लहरीपणावरही हा आनंद किती द्विगुणित होणार हे ठरणार आहे. तालुक्यात उसाचे सरासरी एकरी उत्पादन २५ ते ३५ टनांपर्यंत असले तरी यापेक्षा अधिक उत्पादन घेणारे शेतकरी दरवर्षी वाढत आहेत. त्याचा परिणाम उत्पादन वाढीवरही होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT