Supriya Sule  Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya sule : सरकारविरोधात खटला भरणार ; खासदार सुळे यांचा इशारा

Nanded hospital deaths : नांदेड मेडिकल शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.

Team Agrowon

Amravati News : आमदार विकत घ्यायला पैसे आहेत, परंतु जीवरक्षक औषधांच्या खरेदीसाठी नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील मृत्यू हे नैसर्गिक नसून ती सरकारने केलेली हत्याच आहे. या विरोधात राज्य सरकारविरोधात खटला भरणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत व्यक्‍त केली.

खासदार सुळे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असून, या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मंगळवारी (ता. ३) संत ज्ञानेश्‍वर सभागृहात त्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात औषधी नसल्याने रुग्णाचे मृत्यू होत आहेत. हे मृत्यू नैसर्गिक नसून त्या शासनाने केलेल्या एकप्रकारच्या हत्याच आहेत. या सरकारकडे पक्ष फोडीसाठी पैसा आहे. परंतु जीवरक्षक औषधांच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे. ही बाब निषेधार्ह आहे. गेल्या ९ वर्षांत केंद्रातील सरकारने महागाई वाढवीत सामान्यांचे जगणे अवघड केले आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांप्रति त्यांचे धोरणही संवेदनशील आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा अधिवेशनात सोयाबीनला ७ हजार, कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सरकार जनतेसाठी असते, परंतु सध्या जुमलेबाज नौटंकी सरकार सत्तेत आहे. तर दुसरीकडे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये नाराजी सुरू झाल्याचेही सुळे म्हणाल्या. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शरद तसरे, रमेश बंग, संगिता ठाकरे, सुनीता वऱ्हाडे, हेमंत देशमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT