Supreme Court On Dallewal Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Dallewal Hunger Strike : डल्लेवाल यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे पंजाब सरकारला आदेश; शेतकरी संघटनांना विरोध

Supreme Court On Jagjit Singh Dallewal Hunger Strike : खन्नौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल आमरण उपोषण करत आहेत. शनिवारी (ता.२१) त्यांचा उपोषणाचा २६ वा दिवस असून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा यावरून चिंता व्यक्त केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Protest Against Government : संयुक्त किसान मोर्चा अरायजकीयचे नेते जगजीतसिंह डल्लेवाल त्यांच्या उपोषणाचा आजचा (ता.२१) २६ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती उपोषणामुळे अत्यंत खालावली असून उपचार न घेतल्यास त्यांच्या हृदयाचे ठोके कधीही बंद पडू शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा डल्लेवाल यांच्याविषयी चिंता व्यक्त करत थेट पंजाब सरकारला नवे आदेश दिले आहे. न्यायालयाने डल्लेवाल यांना तात्पुरत्या रूग्णालयात हलवण्याचे आदेश दिले आहे. मात्र शेतकरी संघटनांनी हा आदेश नाकारला असून त्यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

हमीभाव कायद्यासह महत्वाच्या इतर मागण्यांसाठी येथील शंभू सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी डल्लेवाल २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी १३ फेब्रुवारीपासून शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.२०) पंजाब सरकारला उपोषणकर्ते डल्लेवाल यांना खनौरी सीमेवरील तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. हे आदेश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने दिले आहेत. ७० वर्षीय डल्लेवाल गेल्या २५ दिवसापासून उपोषण करत आहेत. यामुळे यांची प्रकृती चिंता जनक झाली असून ते कर्करोगाचे रूग्ण आहेत. तर गुरुवारी (ता.१९) आंघोळ करताना ते बेशुद्ध पडले होते. तर उपचार न घेतल्यास त्यांच्या हृदयाचे ठोके कधीही बंद पडू शकतात, अशी भीती डॉक्टरांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

यानंतर आता शुक्रवारी न्यायालयाने पंजाब सरकारला डल्लेवाल यांच्या प्रकृतीवरून त्यांना चोवीस तास लक्ष ठेवले जाण्यासाठी शिप्ट करा, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने याबाबत पंजाबचे महाधिवक्ता गुरमिंदर सिंग यांना तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी महाधिवक्ता सिंग यांनी, डल्लेवाल यांनी गुरुवारी डॉक्टरांना सहकार्य केले आहे. त्यांनी ईसीजी आणि रक्त तपासणीसह अनेक चाचण्या घेण्यास परवागनी दिली. आता डल्लेवाल यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावाही न्यायालयात केला.

न्यायालयाचे पंजाब सरकारला ताशेरे

नागरी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथक खनौरी सीमेवर पाठवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तसेच पंजाब सरकारला डल्लेवाल यांना आरोग्य तपासणीसाठी राजी करण्यास सांगितले. बेमुदत उपोषणावर असलेल्या डल्लेवाल यांची वैद्यकीय तपासणी न केल्याबद्दल खंडपीठाने पंजाब सरकारला ताशेरेही ओढले होते.

डल्लेवाल यांचे उपोषण सुरूच

डल्लेवाल यांचे खनौरी येथील उपोषण २६ व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान गुरूवारी ते ८ ते १० मिनिट बेशुद्ध झाले होते. यावेळ वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तसेच जीवाला धोका असून उपचार न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ शकतात असा दावाही केला होता. दरम्यान, वरिष्ठ सरकारी डॉक्टरांच्या पॅनेलने डल्लेवाल यांच्या प्रकृतीची तपासणी केली आणि काही वैद्यकीय चाचण्याही केल्या होत्या.

मी प्राणाची आहुती देण्यास तयार : डल्लेवाल

दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास मी माझ्या प्राणाची आहुती देण्यास तयार असल्याचे डल्लेवाल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला सांगितले. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून इशाराही दिला होता. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे. हा शेतकऱ्याच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराप्रमाणे आहे.

शेतकऱ्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी मी प्राणाची आहुती देण्याची मी मानसीक तयारी केली आहे. कदाचीत माझ्या मृत्यूनंतर केंद्र सरकार झोपेतून जागे होईल, असेही डल्लेवाल यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. तर केंद्र सरकार जोपर्यंत हमीभाव कायद्यासह इतर १३ मागण्या पूर्ण करत नाही, आपले उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका डल्लेवाल यांनी घेतलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT