Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची जबाबदारी आपली

Grape Farming : देशाची द्राक्ष उत्पादक संघटना आम्ही बांधली. त्या संघटनेत जत आणि संख भागातील शेतकऱ्यांचा समाविष्ट होता. इथल्या शेतकऱ्यांनी कष्टातून द्राक्ष शेती उभारली आहे.

Team Agrowon

Sangli News : देशाची द्राक्ष उत्पादक संघटना आम्ही बांधली. त्या संघटनेत जत आणि संख भागातील शेतकऱ्यांचा समाविष्ट होता. इथल्या शेतकऱ्यांनी कष्टातून द्राक्ष शेती उभारली आहे. या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

संख (ता. जत) तालुक्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्व. बसवराजकाका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले.

या वेळी खासदार विशाल पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘दुष्काळी भाग आणि पाण्याचे प्रश्न बसवराजकाका माझ्याकडे पोटतिडकीने मांडायचे. ते तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही होते. त्यांना सर्वांची साथ मिळाली.

महाराष्ट्र असो वा शेजारील कर्नाटक राज्य असो एक कालखंड होता ज्या वेळी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नेते पुढे होते. त्यात स्व. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांचा उल्लेख कारावा लागेल. वसंतदादांनी सहकाराचा आधार घेत चांगल्या संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT