Animal Market Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Market : शेळी, बोकड, मेंढ्यांची तळेगाव उपबाजारात घटली आवक

Animal Update : तळेगाव ढमढेरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१८) शेळ्या, बोकड आणि मेंढ्यांची आवक घटली आहे.

गणेश कोरे

Talegaon Dhamdhere News : तळेगाव ढमढेरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१८) शेळ्या, बोकड आणि मेंढ्यांची आवक घटली आहे. गेल्या सोमवारी २००० च्या पुढे आवक झाली होती.

मात्र, सोमवारी २०० ने आवक कमी झाल्याने एकूण १८०० शेळ्या, बोकड व मेंढ्यांची विक्री झाल्याचे बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले व सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितले.

शेळी व बोकडाला कमीत कमी १० हजार रुपये, तर जास्तीत जास्त २१ हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच मेंढीला ७ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सोमवारच्या बाजारात पुणे, अहिल्यानगर मुंबई, सातारा, अलिबाग येथील व्यापारी आले होते. तसेच पुणे व अहिल्यानगर तालुक्यातील मेंढपाळ व शेतकऱ्यांनी शेळी, बोकड व मेंढी विक्रीसाठी आले होते.

सोमवारी येथील उपबाजारात भुसार मालाचीही आवक कमी झाली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. दिवाळीनंतर दोन बाजार मात्र समाधानकारक झाले. या वेळी शेळी, बोकड व मेंढ्यांना दरही समाधानकारक मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biodegradable Packaging : जैवविघटनशील पॅकेजिंगचा वापर, फायदे

Moringa Processing : शेवगा पावडर, कॅप्सूल्स, अर्क निर्मिती तंत्र

Sugarcane Crushing Season: आधी उसाचा दर जाहीर करा, मग कारखाने सुरू करा, अन्यथा वाहतूक रोखू, 'आंदोलन अंकुश'चा इशारा

Organic Farming : प्रयोगशीलतेचा वारसा समर्थपणे वाढविला

Integrated Farming : शेती केली एकात्मिक; दिले प्रयोगशाळेचे रूप

SCROLL FOR NEXT