Seed Supply Agrowon
ॲग्रो विशेष

खरिपासाठी १५ हजार १२५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना पुरवठा

टीम ॲग्रोवन

पुणे ः खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाण्यांचा पुरवठा (Seed Supply) सुरू करण्यात आला आहे. यंदा मागणी (Seed Demand) केलेल्या २७ हजार ६७६ क्विंटल बियाण्यांपैकी १५ हजार १२५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. गावपातळीवर कृषी सेवा केंद्राकडून (Krushi Seva Kendra) हे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

खरीप हंगाम सुरू तोंडावर आला असताना पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने गेल्या एक महिन्यापासून खरिपाची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पुणे विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे २९ हजार ५३० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. सध्या काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असला तरी हवामान विभागाने चांगला पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांना चांगल्या पावसाच्या प्रतीक्षा आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. त्यासाठी खते, बियाण्यांच्या अडचणी येऊ नये म्हणून कृषी विभागाकडून बियाण्यांचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ५ हजार १०८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख २० हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. मागील तीन ते चार वर्षांमध्ये बियाण्यांची कमी-अधिक विक्री झाली आहे. सरासरी २५ हजार १३३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीही खरिपासाठी २६ हजार १८६ क्विंटल बियाण्यांना मंजुरी दिली होती. यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचे अंदाज गृहीत धरून कृषी विभागाकडून एक हजार ४९० क्विंटलने अधिक वाढ करून जवळपास २७ हजार ६७६ क्विंटल बियाण्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून एकूण १५ हजार ७१५ क्विंटल, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून ११ हजार ९६१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने भाताचे १२ हजार ५१० क्विंटलपैकी १२ हजार ५०१ क्विंटल बियाण्यांना मंजुरी दिली असून, प्रत्यक्षात ९ हजार २३६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे. त्यानंतर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने ८ हजार ४३८ क्विंटल बियाण्यांना मंजुरी दिली असून, आतापर्यंत एक हजार ८७० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.

पीकनिहाय बियाण्यांची मागणी

कंसात झालेला पुरवठा (क्विंटलमध्ये)

भात १२,५०१ (९२३६), खरीप संकरित ज्वारी २३ (५२), संकरित बाजरी १२४७, सुधारित बाजरी १५१ (१३२०), मका २२५० (१९८०), तूर १६० (८४), मूग २२८ (३२०), उडीद १०५ (२६०), भुईमूग १२२५ (४००), सूर्यफूल ३५ (३), सोयाबीन ८४३८ (१८७०), वाटाणा ९५३, धेंचा ३२०, ताग ४०

यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. खरिपात बियाण्यांच्या अडचणी येऊ नयेत म्हणून आताच मोठ्या प्रमाणात बियाण्यांची मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. -
ज्ञानेश्‍वर बोठे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT