Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump : कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा करा

Electricity Supply Update : राज्य शासनाने पूर्व विदर्भातील वनव्याप्त गावांची दखल घेत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे.

Team Agrowon

Bhandara News : राज्य शासनाने पूर्व विदर्भातील वनव्याप्त गावांची दखल घेत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत करण्यात आली.

तुमसर तालुक्यातील सोरना, लंजेरा, पीठेसुर, लोहारा, मोहाडी तालुक्यातील जाम, बैठेखारी, कादरी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. पिकांना वाढविण्याकरता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते.

मात्र वीज वितरण कंपनीने आता दिवसा वीज पुरवठा बंद करून रात्री देण्याचे धोरण अवलंबले आहे. वनव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये वाघासह बिबट, रानडुक्कर व इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे.

वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतीत दिवसा जाणे देखील शक्य होत नाही. अशावेळी रात्रीचे वेळी वीज पुरवठा होत असताना पिकाला पाणी देण्याकरता कसे जायचे? असा प्रश्न आहे. त्यामुळे या भागात उदरनिर्वाचा प्रश्न गंभीर झाला असून त्याची दखल घेत शासनाने पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा करावा.

बारा तास वीज पुरवठा करणे शक्य नसल्यास किमान आठ तास तरी वीज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सुवर्णाचे सरपंच धर्मपाल दुर्वे उपसरपंच अरविंद राठोड रोशन सावंतवाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोहाडी तालुक्यातील धोप, ताडगाव, आंधळगाव, सालाई खुर्द, उसर्रा, जांब कांद्री या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. फेब्रुवारीपासून वीज वितरण कंपनीचे रात्रीचा वीजपुरवठा करण्याची नियोजन केले आहे.

वन्य प्राण्यांचा त्रास बघता दिवसात वीजपुरवठा करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य जगदीश शेंडे, उपसरपंच तुलसी मोहतुरे यांनी केली आहे. कार्यकारी अभियंता वैरागडे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT