Ujani Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Irrigation : ‘उजनी’तून रब्बी पिकांसाठी आज सुटणार उन्हाळी आवर्तन

Rabbi Irrigation : उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. याबाबत या आधीच निर्णयही झालेला आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. याबाबत या आधीच निर्णयही झालेला आहे. पण कालवा सल्लागार समिती यावरचा अंतिम निर्णय घेणार आहे, बुधवारी (ता. ५) मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात निर्णय होण्याची शक्यता आहे.

उन्हाचा तडाका वाढत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा ताण पडू लागला आहे, उन्हाळी आवर्तनाबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याने शेतकऱयांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांसह १२५ हून अधिक गावच्या पाणी योजनाही धरणावरच अवलंबून आहेत.

त्यात आता शेतीच्या पिकांनाही ताण पडत असल्याने निर्णय होणे आवश्यक आहे. उजनी धरणात नऊ नोव्हेंबरपर्यंत १११.२८ टक्के (१२३.२८ टीएमसी) पाणीसाठा होता. मागील चार महिन्यांत उन्हाची तीव्रता अधिक नसतानाही धरणातील ३३ टीएमसी पाणी कमी झाले आहे.

शिवाय सध्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठाही ४९.६७ टक्क्यांवर आला आहे. या आधी सोलापूर शहराला दोनदा भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून, शेतीला ही एक आवर्तन देण्यात आले आहे. सध्या सीना-माढा, दहिगाव सिंचन योजना यासाठी ४५३ क्युसेक पाणी सोडण्यात आले.

आता एप्रिलअखेर सोलापूरसाठी आणखी एकदा पाणी सोडावे लागणार आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. धरणातील पाणी २० टक्क्यांवर गेल्यास कालव्यातून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी आणि मागणीचा विचार करता, शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाकडे लक्ष आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

Cotton Production Research: यांत्रिकीकरण, स्वच्छ कापूस उत्पादनावर संशोधन

User Charges: ‘यूझर चार्जेस’ला व्यापाऱ्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT