Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation : ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू

Agriculture Irrigation : ताकारी उपसा योजनेतून यंदाच्या उन्हाळी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन सुरू केले आहे.

Team Agrowon

Sangli News : ताकारी उपसा योजनेतून यंदाच्या उन्हाळी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन सुरू केले आहे. पाणी मुख्य कालव्याच्या शेवटी किलोमीटर १४४ पर्यंत संपूर्ण शेतीला पोहोचविले जाणार आहे. लाभक्षेत्रातील पाणी साठे प्राधान्याने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

यंदा जिल्ह्यातील दुष्काळी टापूतील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात अजिबात पाऊस न पडल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ताकारी योजनेतून आतापर्यंत वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिके कशीबशी जगली आहेत.

मात्र, कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे मागील १५ दिवसांपासून सर्वत्र ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. परिणामी, लाभक्षेत्रातून पाणी मागणी होत होती. यास अनुसरून आठ दिवसांपूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार कृष्णा नदीत ‘ताकारी’जवळ साटपेवाडी बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर शनिवारी (ता. २०) अपेक्षित पाणीपातळी मिळताच सकाळी १० वाजता टप्पा १ वरील ३ पंप सुरू करून पाणी सागरेश्वरमधील संतुलन जलाशयात सोडण्यात आले.

याठिकाणी सुमारे ५ तास पाणी साठवण केल्यानंतर दुपारी ३ वाजता टप्पा २ वरील ८ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आले. शिवाय टप्पा १ वरील पंपही वाढविण्यात आले आहेत. सुरू झालेले पाणी प्रथमतः मुख्य कालव्याच्या ० ते २० वरील पोटकालव्यांना सोडले जाईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते पुढील कालव्यांना दिले जाईल.

पाणी जपून वापरा

‘ताकारी’च्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेतीला पाणी देण्याबरोबरच लाभक्षेत्रातील पाणी साठे प्राधान्याने भरून घेण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पाण्याची वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाटबंधारेने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Demands: राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करा : ठाकरे

Mumbai March Suspended: जरांगे यांचे उपोषण मागे

Monsoon Rainfall Deficit : यंदाचा मॉन्सून २००९ नंतरचा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता; पावसाची तूट १५ टक्क्यांवर

Agarwood Farming: अगरवूड लागवड : सुवर्णसंधी की सुवर्णमृग?

SCROLL FOR NEXT