Irrigation Subsidy : खानदेशात सूक्ष्म सिंचनाचे २०० कोटींवर अनुदान रखडले

Agriculture Scheme : खानदेशात सूक्ष्मसिंचनाचे सुमारे २०० कोटींवर अनुदान रखडले आहेत. इतर मागास वर्गीय, खुल्या प्रवर्गातील शेतकरी या अनुदानासाठी कृषी विभागात चकरा मारीत आहेत.
Irrigation Scheme
Irrigation Scheme Agrowon

Jalgaon News : खानदेशात सूक्ष्मसिंचनाचे सुमारे २०० कोटींवर अनुदान रखडले आहेत. इतर मागास वर्गीय, खुल्या प्रवर्गातील शेतकरी या अनुदानासाठी कृषी विभागात चकरा मारीत आहेत. यातच कृषी विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कार्यालयांत शुकशुकाट राहत आहे.

सूक्ष्म सिंचनासंबंधी केंद्र व राज्य सरकारने योजना आणली आहे. यात मागासवर्गीय, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीय, खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. सूक्ष्म सिंचन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

त्यासाठी प्रथम महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागतो, हा अर्ज मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमती येते, ही संमती आल्यानंतर या संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करावी लागतात. या प्रक्रियेत अनेकांना चार ते सहा महिने लागले.

Irrigation Scheme
Takari Upsa Irrigation Scheme : सांगलीतील दुष्काळी तालुक्यातील ताकारी उपसा सिंचन योजना लवकरच होणार सुरू

कारण अनेकांचे अर्ज तीन-चार महिने प्रलंबित होते. तर काहींचे अर्ज मंजूर झाल्यानंतर चार - सहा महिने पूर्वसंमती आली नाही. पूर्वसंमती आल्यानंतर संकेतस्थळ व्यवस्थित कार्यरत नव्हते. सर्व्हर डाउनची समस्या होती. कागदपत्र अपलोड होत नव्हते. अर्ज, पूर्वसंमती यात सहा ते आठ महिने गेले. यानंतर ठिबक घेऊन शेतकऱ्यांनी ती शेतात कार्यरत केली. कृषी विभागाच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी शेत, स्थळपाहणी केली.

जिओ टॅगिंगचे छायाचित्र घेतले. पुढे ही फाइल कृषी विभागाने पडताळणी, तपासणी करून संकेतस्थळावर अपलोड केली. ती मंडळ अधिकारी यांनी मंजूर करून पुढे अनुदानासाठी पाठविली. यात अनेक फायली चार ते पाच महिन्यांपासून अनुदानासाठी पाठविल्या आहेत. परंतु त्या मंजूर नाहीत. जळगाव जिल्ह्यात खुल्या व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील पाच हजारांवर फायली प्रलंबित आहेत. अशीच स्थिती धुळे व नंदुरबारात आहे.

Irrigation Scheme
Tembhu Irrigation Scheme : टेंभूचे पाणी माण नदीत सोडले

शेतकरी अनुदानासाठी कृषी विभागात चकरा मारीत आहेत. परंतु कार्यवाही होत नाही. आपण मंडळाधिकारी, पर्यवेक्षकांना भेटा, आमच्याकडे ते काम नाही, अशी उत्तरे शेतकऱ्यांना सर्रास जळगाव व अन्य भागातील कृषी विभागात दिली जातात.

अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून सूक्ष्मसिंचनाचे संच म्हणजेच ठिबक, तुषार संच घेतले आहेत. त्याचे कर्ज, व्याज वाढत आहे. दुसरीकडे शासन खुल्या व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना सहा-आठ महिने हे अनुदान देत नाही. हा प्रकार म्हणजे शेतीची पीछेहाट करण्यासाठी कारणीभूत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

निवडणूक कामात व्यस्त...

जळगाव, चोपडा व अन्य भागातील कृषी विभागात सध्या शुकशुकाट राहत आहे. जळगाव तालुका कृषी कार्यालयात तर फक्त एक परिचर व एक लिपिक किंवा कर्मचारी, असे दोनच कर्मचारी सध्या असतात.

तेथे विचारणा केल्यास सर्व जण निवडणुकीच्या कामात आहेत. काय करणार, अनुदानही आचारसंहिता लागू असल्याने येणार नाही, आपण चार महिन्यांनी या, असे सांगितले जाते. यामुळे शेतकऱ्यांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com