Summer Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Farming : अकोला, वाशीममध्ये उन्हाळी भुईमुगाला पसंती

Summer Farming : गेली काही वर्षे दुर्लक्षित राहिलेले भुईमुगाचे पीक या वर्षी उन्हाळ्यात पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन जिल्हे मिळून सुमारे १२ हजार हेक्टरपर्यंत पोचलेले आहे.

Team Agrowon

Akola News : गेली काही वर्षे दुर्लक्षित राहिलेले भुईमुगाचे पीक या वर्षी उन्हाळ्यात पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन जिल्हे मिळून सुमारे १२ हजार हेक्टरपर्यंत पोचलेले आहे. त्यातही अकोला आणि वाशीम या दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. वाशीम जिल्ह्यात सरासरी तब्बल दुप्पट क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे.

तेलवर्गीय भुईमुगाची या भागात सुरुवातीला मोठ्या क्षेत्रावर लागवड व्हायची. मागील तीन-चार वर्षांत पिकावर आलेल्या कीडरोगांमुळे उत्पादन घटले. व्यवस्थापनावरील खर्च व होणारी मिळकत यातील तफावतीमुळे शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीकडे पाठ फिरवली होती. आता पुन्हा उन्हाळी हंगामात या पिकाच्या लागवडीकडे कल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर यात तालुक्यांत भुईमुगाची लागवड केली जाते. या वर्षी ही लागवड ५११६ हेक्टरवर झालेली आहे. सरासरीच्या १०३ टक्के क्षेत्रावर पेरणी पोचली. वाशीम जिल्ह्यात भुईमूग लागवडीने मोठी मुसंडी मारली. यंदा ५०५७ हेक्टरवर पेरणी असून सरासरीच्या १९५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. या दोन जिल्ह्यांत भुईमुगाचे क्षेत्र १० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.

बुलडाणा माघारला

भुईमूग उत्पादनात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले. उन्हाळ्यातील या पिकाला पाण्याची मोठी गरज असते. कमी होत असलेल्या पाऊसमानामुळे व उत्पादकता आणि बाजारभावाच्या कारणाने भुईमुगाची पसंती या जिल्ह्यात घटली आहे.

चाऱ्यासाठी उपयोगी

भुईमुगाच्या पिकाचे अनेक फायदे आहेत. तेलवर्गीय हे पीक खाण्यासाठी फायदेशीर तर आहेच, शिवाय जनावरांसाठी भुईमुगाचे सकस असे कुटारही मिळते. सध्याच्या दुष्काळी काळात चाऱ्याची मागणी असून यंदा या चाऱ्याला दरही चांगले मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

जिल्हा पेरणी

बुलडाणा १८६३ ३९ टक्के

अकोला ५११६ १०३

वाशीम ५०५७ १९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Shredder: ‘महाडीबीटी’वर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT