Fodder Crisis : कोल्हापुरात हिरव्या चाऱ्याची टंचाई

Fodder Issue : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यानंतर चाऱ्यासाठी उसाचे वाढेही गायब झाले आहेत. यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon

Kolhapur News : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यानंतर चाऱ्यासाठी उसाचे वाढेही गायब झाले आहेत. यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. सध्या गवत व मक्यावरच चाऱ्याची भिस्त आहे.

नदीकाठची गावे वगळता अन्य गावात मात्र हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्रमाणात टंचाई असली तरी अजिबात चाराच नाही अशी स्थिती नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात गाय, म्हैस दोन्ही मिळून ८ लाख ५२ हजार जनावरे आहेत. यामध्ये गाईंची संख्या २ लाख ८० हजार, तर म्हशींची संख्या ५ लाख १० हजारांच्या आसपास आहे. प्रत्येक वर्षी ऊस हंगाम सुरू असेपर्यंत उसाचा चारा उपलब्ध असतो. यंदा मात्र ऊस तोडणी कामगारांनी शेवटच्या टप्प्यात ऊस जाळून नेण्यासाठी प्रयत्न केले.

त्यामुळे उसाचा चारा मार्चपासून कमी प्रमाणात उपलब्ध झाला. यामुळे गेल्या एक महिन्यापासूनच हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, हिरव्या चाऱ्याअभावी दूध उत्पादनातही घट होत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याची बेगमी म्हणून वाळलेल्या चाऱ्याची गंजी रचण्यात पशुपालकांची धावपळ उडाली आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : पुरंदर, बारामतीत भीषण चाराटंचाई

हिरवा चारा नसल्याने या गंजीतीलच सुका चारा टाकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. उसात भांगलणी सुरू असल्या तरी उसाचा पाला काढण्यात येत नाही.

पावसाळ्यातच हा पाला काढून त्याचा वापर चाऱ्यासाठी केला जातो; परंतु आता एप्रिल व मे हे दोन महिने हिरव्या चाऱ्याअभावी कसे काढायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.

काही शेतकरी उसात किंवा स्वतंत्रपणे चारावर्गीय असलेल्या मक्याचे उत्पादन घेत आहेत. ऐन हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमध्ये पशुपालकांना हा चारा उपयुक्त ठरत आहे. असे आहेत दर सरी किंवा गुंठ्यावर हा मका विकला जात आहे. मध्यम लांबीच्या एका सरीला तीनशे ते साडेतीनशे, तर दहा गुंठ्यांतील मक्यासाठी सात ते आठ हजारांचा दर आहे.

अनेक गोठाधारकांची चाऱ्यासाठी स्वतंत्र शेती असली तरी ज्या शेतकऱ्यांची एक ते दोन जनावरे आहेत त्यांना मात्र चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. नदी व विहिरीतील पाण्याचा स्रोत खाली गेल्याने चाऱ्याचे उत्पादन घेण्याचेही आव्हान आहे.

Fodder Shortage
Fodder Crisis : पश्‍चिम विदर्भात चाराटंचाईची चाहूल

हिरव्या चाऱ्याचे दर (किरकोळ बाजारात)

वाडे ७० रुपये बिंडा

शाळू १०० रुपयांना ५ पेंढ्या

गवत २० रुपयांना एक पेंढी

हत्तीघास १०० रुपयांना ५ पेंढ्या

शेवरी, तुती, शिवबाभळ, हुंबर २० रुपयांना

एक पेंढी

मका ५० रुपये पेंढी

जूनपर्यंत तीव्र

टंचाईची शक्यता नाही

कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख दूध संघांनी जानेवारीमध्ये शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप केले आहे. तो चारा सध्या उपलब्ध होत आहे. यामुळे जूनपर्यंत तरी कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र चाराटंचाई जाणवणार नाही.

ही माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली. विभागाच्या वतीने आणखी चारा बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तातडीने उपलब्ध झाल्यास जूनमध्येही चारा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com